आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने नुकतीच नवी क्रमवारी जाहीर केली. खेळाडूंच्या वैयक्तिक क्रमवारीत अनेक खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस मिळाले. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या वनडे मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला मिळाले. मालिकेत सर्वाधिक बळी मिळवणारा सिराज या नव्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत सिराज याने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन तर दुसऱ्या सामन्यात त्याने तीन बळी मिळवत भारताच्या विजयात योगदान दिले. तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे त्याने मालिकेत सर्वाधिक नऊ बळी नावे केले.
सिराज 2020 मध्ये या क्रमवारी 279 व्या क्रमांकावर होता. त्यानंतर त्याने सातत्याने चांगली कामगिरी करत संघातील आपले स्थान मजबूत केले. तो 2021 पासून भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत त्याने संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. या क्रमवारीत पहिल्या स्थानी न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवूड आहे. हे दोन्ही खेळाडू सध्या कोणत्याही प्रकारचे वनडे क्रिकेट खेळणार नाहीत. मात्र, सिराज न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार असल्याने त्याला या क्रमवारीत पहिल्या स्थानी जाण्याची संधी असेल.
सिराज हा यावर्षी भारतात होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी मोठा दावेदार आहे. अनुभवी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्यानंतर तो संघाचा तिसरा वेगवान गोलंदाज असू शकतो. त्याला उमरान मलिक व दीपक चहर यांच्याकडून आव्हान मिळेल.
(Mohammad Siraj Reach Third Spot In Latest ODI Bowling Ranking)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉसचा निकाल भारताच्या पारड्यात! दोन धुरंधरांचे पुनरागमन, तर ईशानचाही ताफ्यात समावेश
सरफराजने शतक ठोकल्यानंतर ‘सिद्धू मूसेवाला’च्या अंदाजात केले सेलिब्रेशन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध