सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) दुसरा सामना भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात खेळला जात आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशविरुद्ध मोहम्मद शमीने (Mohammed Shami) इतिहास रचला. त्याने जाकेर अलीच्या रूपात त्याचा 200वी वनडे विकेट्स पूर्ण केली.
मोहम्मद शमी ‘मिचेल स्टार्क’नंतर (Mitchell Starc) वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज बनला आहे.
बांगलादेशविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना हा मोहम्मद शमीचा 104वा वनडे सामना आहे. या सामन्याच्या पहिल्याच षटकात शमीने विकेट घेतली. त्याने सौम्या सरकारला शून्यावर बाद केले. पॉवरप्लेमध्येच त्याने मेहदी हसनच्या रूपात आणखी एक मोठी विकेट घेतली.
68 धावा काढल्यानंतर जाकेर अली खेळत होता. 43व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शमीने विराट कोहलीच्या हातात त्याला झेलबाद करून शमीने त्याचा 200वा वनडे विकेट्स पूर्ण केल्या. शमी हा वनडे सामन्यात सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला.
पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आहे, त्याने 102 सामन्यांमध्ये हा आकडा गाठला. शमीने 104 सामन्यांमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या. सर्वात कमी वनडे सामन्यात भारतासाठी 200 विकेट्स घेणारा शमी पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
भारतासाठी वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स-
1) अनिल कुंबळे (337)
2) जवागल श्रीनाथ (315)
3) अजित आगरकर (288)
4) झहीर खान (282)
5) हरभजन सिंग (269)
6) कपिल देव (253)
7) रवींद्र जडेजा (226)
8) मोहम्मद शमी (200)
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानचा स्टार फलंदाज निराश..! म्हणाला…
फखर जमानच्या जागी कोण? माजी कर्णधाराच्या नातेवाईकाला संघात स्थान
रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे भविष्य चॅम्पियन्स ट्रॉफीवर अवलंबून? माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य






