---Advertisement---

शमीच्या वादळात उडाली इंग्लंडची फलंदाजी, ट्वीटरवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर

---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये यजमान भारतीय संघाने इंग्लंडला 100 धावांनी धूळ चारली आहे. उभय संघांतील हा सामना लखनऊच्या भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळला गेला. रोहित शर्मा याने केलेल्या 87 धावांच्या महत्वपूर्ण खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. मात्र, मोहम्मद शमी याचेही विशेष होत आहे. सोशल मीडियावर शमीविषयी प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला आहे.

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्सच्या नुकसानावर 229 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघ अवघ्या 129 धावांवर गुंडाळला गेला. रोहित शर्मा याने 101 चेंडूत 87 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तसेच मोहम्मद शमी भारतासाठी दुसरे सर्वोत्तम प्रदर्शन करणारा खेळाडू ठरला. इंग्लंडच्या डावात शमीने 7 षटके गोलंदाजी केली आणि यात 22 धावा खर्च करून 4 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. यामध्ये बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, मोईन अली आणि आदिल राशीद या अनुभवी खेळाडूंचा समावेश होता. शमीच्या या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडसारखा बलाढ्य संघ देखील दुबळा वाटू लागला होता. परिणामी भारताने या सामन्यात मोठा विजय मिळवला.

शमीचे या सामन्यातील प्रदर्शन पाहून चाहते सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत. मोहम्मद शणीला विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यांमध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र, शेवटच्या दोन सामन्यात त्याने अनुक्रमे पाच आणि चार विकेट्स घेत जोरदार पुनरागमन केले. यासाठी सर्वत्र त्याचे कौतुक सरू आहे.

उभय संघांतील या सामन्यात शमीव्यतिरिक्त भारतासाठी जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनीही महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. बुमराहने सलामीवीर डेविड मलान, जो रुट आणि मार्क पुड यांना तंबूत धाडले. तर कुलदीपने मधल्या षटकांमध्ये सेट जोस बटलर आणि लियाम लिविंगस्टोन यांच्या विकेट्स घेतल्या. दुसरीकडे पराभूत झालेल्या इंग्लंडसाठी डेविड विली याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्स आणि आदिल राशीद यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. मार्क वुड याला एक विकेट मिळाली.

महत्वाच्या बातम्या – 
विराट शून्यावर बाद होताच इंग्लंडच्या बार्मी आर्मीने उडवली खिल्ली, भारतीय यू-ट्यूबरने केली बोलती बंद 
भारताचा भीमपराक्रम! पराभव केला इंग्लंडचा, पण World Record तुटला न्यूझीलंडचा; बनला दुसराच संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---