भारतीय संघाने क्रिकेट जगताला एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज दिले आहेत. यामध्ये मोहम्मद शमी या घातक वेगवान गोलंदाजाचाही समावेश आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. तसेच, संघ आपला पाचवा सामना न्यूझीलंडविरुद्ध धरमशाला येथे खेळत आहे. या सामन्यात संघाने मोहम्मद शमी या धुरंधराला संधी दिली आहे. या संधीचं सोनं करण्यात शमीही चुकला नाही. त्याने पहिल्याच चेंडूवर संघाला मोठी विकेट मिळवून दिली.
शमीने काढला यंगचा काटा
या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी त्याने संघात मोहम्मद शमी (Mohammed Shami) यालाही ताफ्यात सामील केल्याची माहिती दिली. सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवे आणि विल यंग सलामीला उतरले होते. यावेळी न्यूझीलंडला पहिला धक्का कॉनवेच्या रूपात 9 धावांवर बसला. त्याला मोहम्मद सिराजने श्रेयस अय्यरच्या हातून झेलबाद करत शून्यावर तंबूत पाठवले. त्यानंतर शमीने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला.
WICKET ON THE FIRST BALL BY MOHAMMED SHAMI…!!!
What a return to the team – New Zealand 2 down. pic.twitter.com/BN6boNOKVJ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
झाले असे की, न्यूझीलंडच्या डावात मोहम्मद शमी डावातील नववे आणि आपले पहिलेच षटक टाकण्यासाठी आला. यावेळी स्ट्राईकवर विल यंग (Will Young) होता. शमीने टाकलेला चेंडू यंगला खेळता आला नाही. त्यामुळे चेंडूने थेट स्टम्पचा वेध घेतला. अशाप्रकारे शमीने यंगला त्रिफळाचीत बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी विल यंग 27 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 3 चौकारांचाही समावेश होता.
https://www.instagram.com/p/CysiAeMPgvz/
विश्वचषकात दुर्लक्षित केलेला खेळाडू
खरं तर, शमी ही विकेट घेताच विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बनला. त्याच्या नावावर 32 विकेट्स झाल्या. त्याने अनिल कुंबळे (31 विकेट्स) याचा विक्रम मोडला. मात्र, तो विश्वचषकात दुर्लक्षित केला गेलेला भारतीय खेळाडू आहे. त्याला अनेकदा विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यातून वगळले जाते. तसेच, पर्यायी खेळाडू म्हणून त्याचा वापर केला जातो.
Mohammed Shami – an underrated player for India in the ICC events. pic.twitter.com/QNbqK6RX5U
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
शमीच्या वनडे कारकीर्दीवर नजर टाकली, तर त्याने या सामन्यापूर्वी 94 सामने खेळताना 25.50च्या सरासरीने आणि 5.57च्या इकॉनॉमी रेटने 171 विकेट्स घेतल्या आहेत. (Mohammed Shami takes will young wicket in ind vs nz match cwc 2023)
हेही वाचा-
क्या बात है! अवघ्या 9 धावांवर न्यूझीलंडला बसला पहिला धक्का, सिराजने ‘असा’ काढला कॉनवेचा काटा
IND vs NZ Toss: महत्त्वाच्या सामन्यात रोहितने जिंकली नाणेफेक, पंड्यासह ‘या’ खेळाडूला केलं संघाबाहेर