भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed shami) आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. या ३१ वर्षीय गोलंदाज भारतासाठी क्रिकेटचा तिन्ही फाॅरमॅटमध्ये जवळपास ९ वर्षापासून देशाचे प्रतिनिधीत्व करत आहे. शमीने या ९ वर्षांत भारतासाठी ५७ कसोटी सामने, ७१ एकदिवसीय सामने आणि १७ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. नुकताच तो एका कार्यक्रमामध्ये त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलला.
यावेळी शमीने भारतीय संघाच्या त्या फलंदाजाचे नाव उघड केले, ज्याला तो नेटमध्ये गोलंदाजी करू इच्छित नाही. बीसीसीआय त्याला फक्त गोलंदाजीसाठी पैसे देते आणि ते त्याचे काम असल्याचे त्याने स्पष्ट केले. शमी म्हणाला की, ‘मला प्रत्येकाला गोलंदाजी करणे आवडते, पण चेतेश्वर पुजाराप्रमाणे तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. सर्वांना माहित आहे की, तो जोपर्यंत १०० ते २०० चेंडू मारत नाही तोपर्यंत त्याला झोप येत नाही.’ मोहम्मद शमी इंडीयन एक्सप्रेसच्या आयडीया एक्सचेंज या कार्यक्रमादरम्यान पाहुणे म्हणून आला होता.
पुजाराचा श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही, परंतु कसोटीत गोलंदाजांना निराश करण्याची त्याची क्षमता बहुतेकांना माहीत आहे. ३४ वर्षीय फलंदाजाने ९५ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून त्याने ४३.८८ च्या सरासरीने ६७१३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ३ द्विशतके तसेच १८ शतके आणि ३२ अर्धशतके आहेत.
शमीने बुमराहसोबतच्या भेटीबद्दल सांगितले की, “मी त्याला प्रथमच आयपीएलदरम्यान पाहिले होते. त्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे त्याला पाहुन जरा विचित्रच वाटले. मला आश्चर्य वाटले की एखादी व्यक्ती एवढ्या वेगाने गोलंदाजी कशी करू शकते आणि त्याला शक्ती कुठून मिळते. जेव्हा त्याला भारतीय संघात सामील करण्यात आले तेव्हा मी त्याला चांगले ओळखत होतो. त्याने चांगली कामगिरी केली आणि तो कसोटी संघाचा भाग बनला. आज तुम्हाला एक वेगळा जसप्रीत बुमराह दिसतोय. त्याच्याकडे नियंत्रण आहे, त्याच्याकडे सर्वकाही आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
रशियाच्या हल्ल्यावेळी यूक्रेनमध्ये होते पीटरसनचे कुटुंबीय, मग त्यांचे पुढे काय झाले? वाचा सर्वकाही
मराठीत माहिती- क्रिकेटर सलील अंकोला
त्याचं नशीबचं इतकं खराब होतं की सचिनबरोबर पदार्पण केलं, पण खेळला एकच कसोटी सामना