भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (17 फेब्रुवारी) दिल्लीत सुरू झाला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या आणि पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला स्वस्तात गुंडाळले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शमीने खास प्रतिक्रिया दिली. शमीच्या मते भारतीय खेळपट्टीवर फक्त फिरकी गोलंदाजांनाच नाही, तर वेगवान गोलंदाजांना देखील फायदा मिळतो.
मोहम्मद शमी याने घेतलेल्या चार विकेट्सच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला अवघ्या 263 धावांवर गुंडाळले. शमीने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन यांच्या विकेट्स घेतल्या. या चार विकेट्स घेण्यासाठी 14.4 षटके गोलंदाजी केली आणि यात 60 धावा खर्च केल्या. डावाच्या सुरुवातील आणि शेवटच्या षटकात शमीने या विकेट्स घेतल्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना शमी म्हणाला की, “तुम्हाला भारतीय खेळपट्टीत जास्त फरक दिसणार नाही. जर नवीन चेंडून फायदा मिळत असेल, तर जुन्या चेंडूनेही रिवर्स स्विंग करू शकतो. वेगवान गोलंदाजाच्या रूपात तुम्ही कोणत्या स्थानी क्षेत्रात गोलंदाजी करतो आणि पूर्णवेळ स्वतःची गती कायम ठेवावी लागते. दिल्लीची खेळपट्टी नागपूरपेक्षा वेगळी नाहीये. सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने धावा केल्या, पण मी योग्य लाईन-लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.”
“आम्ही सर्वजण देशांतर्गत क्रिकेट खेळून इथे आलो आहोत. सर्व वेगवान गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले आहे आणि मायदेशातील परिस्थितीचा कसा फायदा घ्यायचा हे त्यांना चांगले माहिती आहे. भारतात फक्त फिरकी गोलंदाजांना किंवा वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, असे म्हणणे चुकीचे आहे. भारतीय खेळपट्टीवर काही ना काही फायदा मिळतोच. दुसरे काही नाही तर रिवर्स स्विंग मिळतोय,” असेही शमी पुढे म्हणाला. दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या आहेत. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल दुसऱ्या दिवशी खेळ सुरू करतील. (Mohammed Shami, who took four wickets on the first day of the Delhi Test Reacts on the pitch)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर बवुमा टी20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार! कसोटी नेतृत्वातही बदल
कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळणाऱ्याल पुजारासोबत रोहित चुकीचा वागला! माजी दिग्गजही संतापला