भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असलेली दिसते. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वर्कआऊट करताना दिसत आहे. यादरम्यान तिने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘लडकी ब्युटीफूल’ हे गाणे पाठीमागे लावले होते. या गाण्याचे बोल तिने आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देखील लिहिले आहेत.
हसीन त्या व्हिडिओत लेग पुशअप्स आणि आर्म एक्सरसाइज करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर लोक अनेक प्रकारचे कमेंट्स करत आहेत. अनेक लोकांनी तर चक्क वाईट कमेंट्सही केल्या आहेत. तसेच काहींनी तिची प्रशंसा करत, ती सर्वात सुंदर महिला असल्याचे सांगितले आहे. यापूर्वीही तिच्या अनेक फोटो आणि व्हिडिओंवर चाहत्यांनी कमेंट करत लग्न करण्याचाही प्रस्ताव ठेवला होता.
https://www.instagram.com/p/CCf3Cx9gRcb/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी हसीनने एक भूताचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले होते, “खूप वाईट लोक आहात तुम्ही. अशाप्रकारचे व्हिडिओ बनवता तसेच तोदेखील खूप वाईट आहे, ज्याने मला हा व्हिडिओ सेंड केला आहे.” या व्हिडिओत भूत बनलेली मुलगी नमाज पडताना दिसत आहे. ती त्यावेळी अचानक भूत बनते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका चाहत्याने लिहिले होते, “नमाजची थट्टा उडवू नका प्लिझ.”
https://www.instagram.com/p/CCbTSgaAafD/?utm_source=ig_web_copy_link
शमी (Mohammed Shami) आणि हसीन (Hasin Jahan) मागील काही वर्षांपासून वेगवेगळे राहत आहेत. दोघांमध्येही वाद झाले आहेत. तिने शमीवर गंभीर आरोप लावले होते. तेव्हापासून हे दांपत्य वेगवेगळे राहत आहेत. त्यांना एक मुलगी देखील आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भुवीचा खास फॅनला रिप्लाय; हॅलो ‘आंटी’, असा रहातो मी फीट
-२० वर्ष लागली, परंतू तो कारनामा वेस्ट इंडिजने करुनच दाखवला