भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजनं गेल्या वर्षभरात खूप नाव कमावलं आहे. आता त्याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सिराजचा एकदिवसीय विश्वचषकातील उपविजेता आणि टी20 विश्वचषकाच्या विश्वविजेत्या भारतीय संघात समावेश होता. त्यापूर्वी तो 2023 आशिया कपमध्येही हिरो ठरला होता. अशा या भारतीय गोलंदाजाच्या घरात नवा पाहुणा दाखल झाला आहे. हा नवा पाहुणा म्हणजे त्यांची नवीन लँड रोव्हर कार आहे.
मोहम्मद सिराजनं इंस्टाग्राम पोस्ट टाकून त्याच्या नवीन कारचे फोटो शेअर केले. यावेळी सिराजसोबत त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते. सिराजनं शोरूममधील एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कारसोबत पोज देताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सिराजनं एक खास संदेशही लिहिला – “जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, तर तुम्हाला हवं ते साध्य करता येईल”.
सिराजने या पोस्टमध्ये लांबलचक कॅप्शन लिहिलं. त्यानं लिहिलं, “तुमच्या स्वप्नांना मर्यादा नसावी. कारण यामुळे तुमची जास्त मेहनत करण्याची आणि अधिक गोष्टी साध्य करण्याची भूक वाढते. तुमचे नियमित प्रयत्नच तुम्हाला पुढे घेऊन जातात. मी देवाचा आभारी आहे की त्यानं मला माझ्या कुटुंबासाठी ही ड्रीम कार खरेदी करण्यास सक्षम बनवलं.”
Have NO LIMITS on your DREAMS, as they push you to work harder and strive for more.
It’s the effort you put in with consistency that will take you forward. Grateful to the Almighty for his blessings and for making me capable of buying this dream car for my family. pic.twitter.com/iQzTD4btrA
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) August 11, 2024
मोहम्मद सिराज जरी आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असला, तरी त्याचं सुरुवातीचं जीवन संघर्षमय होतं. सिराजनं 2017 मध्ये टी20 द्वारे भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं 2019 मध्ये एकदिवसीय आणि 2020 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सिराजच्या नावे भारतासाठी 16 टी20 सामन्यांमध्ये 14 विकेट आहेत. याशिवाय त्यानं 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 71 आणि 27 कसोटी सामन्यांमध्ये 74 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा –
मोठी बातमी! विराट-रोहित दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार, अन्य वरिष्ठ खेळाडूंनाही खेळण्यास सांगितलं
केन विल्यमसन कर्णधार नाही! भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर
कॅरेबियन पॉवर! षटकार अन् तोही 113 मीटर लांब….चेंडू पुन्हा दिसलाच नाही