ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. भारतीय संघाने आपल्या नवोदित खेळाडूंच्या जोरावर चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील दुसर्या सामन्यात पदार्पण करणार्या मोहम्मद सिराजने आपल्या उत्कृष्ठ कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला आहे. त्यांनंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सोशल मीडियावरून पुन्हा एकदा मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री मोहम्मद सिराजचे कौतुक करताना म्हणाले ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद सिराज हा भारतीय संघाला लागलेला शोध आहे. त्यांनी भारतात आल्यानंतर आपल्या सोशल मीडियावरील ट्विटर अकाऊंटवरून मोहम्मद सिराजच्या बाबतीत एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी ट्विट करताना लिहले आहे की, “गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी ज्या प्रकारे मोहम्मद सिराजने निभावली, त्या अनुषंगाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला लागलेला शोध आहे. सिराजने आपल्या वडिलांना गमावले,वर्णभेदावरुन टीका सहन केल्या, हे सर्व झाल्यानंतर ही तो भारतीय संघाचा दुवा म्हणून सोबत राहिला.”
Find of the tour for shoring up the bowling attack the way he did – Mohd Siraj. He fought through personal loss, racial remarks and channelised them to find home in the team huddle 🇮🇳 pic.twitter.com/qkzpXgqQiX
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 22, 2021
मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या, बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील तिसर्या कसोटी सामन्यात आपले कसोटी पदार्पण केले. त्याने या मालिकेतील दोन सामने खेळताना एकूण 13 विकेट्स मिळवल्या. त्याचबरोबर त्याने ब्रिस्बेन येथे झालेल्या सामन्यातील दुसर्या डावात 5 विकेट्स घेऊन भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याचबरोबर मोहम्मद सिराज आणि इतर खेळाडूंच्या महत्वपूर्ण योगदानामुळे भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाबरोबर भारतीय संघाने चार सामन्यांची बॉर्डर गावसकर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
त्यांनंतर भारतीय संघ गुरुवारी(20 जानेवारी) मायदेशी परतला. त्यानंतर मोहमद सिराज हैदराबादला गेला. तेथून त्याने घरी न जाता स्मशानभूमीत गेला. तेथे जावून त्याने आपल्या वडिलांच्या थडग्या(कब्र) समोर उभे राहुन वडिलांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेल्यानंतर कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. परंतु सिराजला बातमी कळूनसुद्धा तो मायदेशी परतला नाही. उलट भारतीय संघासोबत थांबण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांच्या वडिलांची इच्छा होती, त्याने भारतीय संघासाठी खेळावे, म्हणून तो तिथे थांबला आणि आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका हा संघ जिंकेल, मायकल वॉन यांची पुन्हा भविष्यवाणी
पुजाराच्या जखमांवर त्याच्या चिमुकलीने शोधला ‘क्यूट’ उपाय, वाचून तुम्हीही व्हाल भावूक
“तुझ्याशिवाय आयपीएल पहिल्यासारखं असणार नाही”, मलिंगाच्या निवृत्तीने रोहित आणि बुमराह झाले भावूक