भारत आणि बांगलादेश या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली गेली. या मालिकेत भारताने 2-0ने बांगलादेशला व्हाईटवॉश दिला. या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशी परतला. मात्र, भारताच्या मोहम्मद सिराज याला विस्तारा एअरलाईन्ससोबत प्रवास करताना वाईट अनुभव आला. भारतीय संघासोबत बांगलादेश दौऱ्यावर गेलेला सिराज जेव्हा भारतात परतला, तेव्हा त्याचे सामान हरवले. सामान हरवल्याचे त्याने दु:ख सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. सिराजने एअरलाईन्सला विनंती केली की त्याला त्याचे सामान लवकरात लवकर मिळावे कारण, त्यात त्याच्या महत्वाच्या गोष्टी आहेेत. सिराजने या दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत 6 विकेट घेतल्या, तर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतासाठी 7 विकेट घेतल्या.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याने ट्विटरवर लिहिलेे की, “त्यात माझे महत्वाचेे सामान होते, मी तुम्हाला विनंती करतो की आवश्यक त्या गोष्टी करुन मला माझे सामान हैदराबादमध्ये पोहोच झाले पाहिजे.” यावर एअरलाईन्सने उत्तरही दिले आणि लवकरात लवकर सामानाची माहिती देण्याचे वचन दिले.
भारतीय संघ डिसेंबर महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर होता. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-1ने गमावली, तसेच दोन कसोटी सामन्यांच्या मालिेकेत भारताने बांगलादेशला 2-0ने क्लिन स्वीप दिला. सिराजने भारतासाठी आतापर्यंत 15 कसोटी सामने, 16 एकदिवसीय सामने आणि 8 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. सिराजने या तिनही प्रकारात 46, 24 आणि 11 विकेट घेतल्या. भारताला 3 जानेवारीपासून 3 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. सिराज एकदिवसीय संघाचा भाग आहे. मात्र, त्याला टी20 संघात जागा मिळू शकली नाही.
मोहम्मद सिराज याने बांगलादेेशच्या पहिल्या कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्याने बांगलादेशच्या पहिल्या डावात 3 विकेट घेतल्या होत्या. या डावात त्याने बांगलादेशचा धाकड फलंदाज नजमुल होसेन शंटो (Najmul Hossain Shanto) याला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर त्याने बांगलादेशचा दुसरा सलामीवीर झाकीर हसन (Zakir Hasan) यालाही तंबूचा रस्ता दाखवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
2022मध्ये 200 शतके! क्रिकेटच्या इतिहासात यावर्षी रचला गेला बलाढ्य विक्रम, तुटले सर्व रेकॉर्ड्स
आठवडाभरातच रिक्षा चालकाच्या मुलाचे नशीब फळफळले! पहिले आयपीएल नंतर टीम इंडियात केला प्रवेश