भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना ३ धावांनी जिंकला. परंतु सामन्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा वेस्ट इंडीज ३०९ धावांचे लक्ष्य गाठेल, असे वाटत होते. शेवटच्या षटकात असेही वाटत होते की, सामना सुपर ओव्हरपर्यंत खेळला जाईल. परंतु मोहम्मद सिराजच्या एका जबरदस्त यॉर्करमुळे भारतीय संघाने दौऱ्यातील पहिला विजय मिळवला.
वेस्ट इंडीजसाठी काईल मायर्स (७५) आणि ब्रँडन किंग (५४) यांनी सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि या दोघांच्या जोरावर वेस्ट इंडीजने जवळपास सामना जिंकलाच होता. परंतु शेवटच्या षटकात मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने चमकदार कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडीजला या सामनील शेवटच्या षटकात १५ धावांची आवश्यकता होती, पण त्यांना विजयासाठी ३ धावा कमी पडल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला.
मोहम्मद सिराजने टाकेलेल्या शेवटच्या षटकातील पहिला चेंडू वाईड यॉर्कर होता, ज्यावर अकेल हुसेनला एकही धाव घेता आली नाही. पुढचा चेंडू त्याने फलंदाजाच्या पायावर टाकला, जो पॅडला लागून पॉइंटच्या दिशेने गेला. या चेंडूवर वेस्ट इंडीजाल एक धाव मिळाली. तिसऱ्या चेंडूवर रोमारियो शेफर्ड स्ट्राईकवर होता आणि सिराजने एक उत्कृष्ट यॉर्कर टाकला. परंतु चेंडू बॅटच्या आतमधील किनाऱ्याला लागल्यामुळे फाईन लेगच्या दिशने चौकार गेला. चौथा चेंडूही पायावर लागला होता आणि यावर शेफर्डने दोन धावा घेतल्या. त्यानंतर पाचवा चेंडू त्याने लेग स्टंपच्या बाहेर यॉर्कर टाकला. यष्टीरक्षक संजू सॅमसनने चपळाई दाखवल्यामुळे हा चौकार वाचला, जो संघासाठी चांगलाच महागात पडू शकत होता.
शेवटच्या दोन चेंडूंवर वेस्ट इंडीजला विजयासाठी ७ धावा हव्या होत्या. षटकातील पाचवा चेंडूवर सिराजने यॉर्कर टाकला, ज्यावर शेफर्डला २ धावांवर समाधान मानावे लागले. शेवटच्या चेंडूवर जर फलंदाजाने चौकार मारला असता, तर सुपर ओव्हर झाली असती. परंतु शेवटच्या चेंडू देखील सिराजने पुन्हा एकदा यॉर्कर टाकला, जो शेफर्डच्या बॅटला लागला देखील नाही. तरीदेखील फलंदाजांनी यावर एक धाव घेतली आणि वेस्ट इंडीजला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हाफ पँट’वर क्रिकेट, नको रे बाबा! पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चहलचे मजेशीर प्रत्युत्तर
प्रसिद्ध अभिनेत्याचे क्रिकेट खेळताना निधन; टेलिव्हिजनसृष्टी हळहळली
काउंटी क्रिकेटमध्ये खणकतय नवदीप सैनीचं नाणं, पदार्पणाच्या सामन्यातच बनला ‘मॅन ऑफ द मॅच’