क्रिकेटमध्ये तसे पाहायला गेले, तर स्लेजिंग हा खेळाचाच एक भाग समजला जातो. खासकरून जेव्हा दोन मोठे संघ एकमेकांविरुद्ध खेळत असतात, तेव्हा खेळाडू एकमेकांना स्लेज करताना दिसून येतात. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडू विरोधी संघातील खेळाडूंना विचलित करण्यासाठी स्लेजिंग करत असतात. असाच स्लेजिंगचा प्रकार इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दिसून आला.
भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज पहिल्या दिवसापासूनच आक्रमक दिसत होता. पहिल्या कसोटी सामन्यातील इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या सलामीवीर डोमिनिक सिब्ली सोबत सिराजचा वाद झाला. जेव्हा सिब्लीने सिराजला चौकार मारला, तेव्हा सिराजने रागात सिब्लीला स्लेज केले. सिराज आणि सिब्लीचा स्लेजिंगचा हा प्रकार खूप वेळ चालू होता.
https://twitter.com/PrabS619/status/1423917327683186690
असे केवळ एकदाच नाही तर दोन वेळा सिराज इंग्लिश खेळाडूंसोबत वाद घालताना दिसून आला. पहिल्या डावात भारताची शेवटची विकेट काढण्यात जेम्स अँडरसनला अपयश येत होते, त्यावेळी जसप्रीत बुमराह आणि सिराज मैदानात राहून भारताच्या धावसंख्येत भर घालत होते. याला वैतागून अँडरसन सिराजला काहीतरी बोलला. जे की, सिराजला अजिबात आवडले नाही आणि त्यानेही अँडरसन सोबत हुज्जत घातली. या घटनेचा व्हिडिओ देखील कॅमेऱ्यात कैद झाला. आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Mohammed Siraj sledging Jimmy Anderson 😂 #ENGvsIND #Anderson #KLRahul pic.twitter.com/YlnVLPyPxP
— Ashwani Pratap Singh (@Ashwaniiisingh) August 6, 2021
अखेरच्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी
या सामन्यात इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर संपला. पण पहिल्या डावात ९५ धावांची पिछाडी स्विकारल्याने इंग्लंडने भारतासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवले आहे. चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १४ षटकात १ बाद ५२ धावा केल्या आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी भारताला १५७ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला विजयासाठी भारताच्या ९ विकेट्स घेण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या –
–भन्नाट! रिषभ पंतने बुमराहच्या गोलंदाजीवर सिब्लीचा घेतला अप्रतिम झेल, व्हिडिओ व्हायरल
–सीएसकेचा मोठा निर्णय! सुवर्ण विजेत्या नीरजला देणार एक कोटी आणि ‘ही’ खास भेट