---Advertisement---

सिराज तुला सलाम! कठीण काळात साथ देणाऱ्या आरसीबीसाठी धुडकावली मोठी रक्कम

On: गुरूवार, डिसेंबर 2, 2021 8:09 PM
siraj rcb
---Advertisement---

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी खेळाडूंना रिटेन करण्याचा कालावधी मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपुष्टात आला. आठ फ्रॅंचाईजींनी मिळून २७ खेळाडूला कायम ठेवले. बेंगलोरस्थित फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर बेंगलोर (आरसीबी) संघाने या रिटेंशनमध्ये माजी कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल व भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना कायम ठेवले. या रिटेंशननंतर सिराजबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

आरसीबीने केले तिघांना रिटेन
आयपीएल २०२२ पूर्वी प्रत्येक संघाला चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली होती. आरसीबीने मात्र केवळ तीनच खेळाडूंना आपल्या संघात कायम केले. यामध्ये संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याला १५ कोटी, ग्लेन मॅक्सवेलला ११ कोटी आणि मोहम्मद सिराजला ७ कोटी रुपये देत पुढील हंगामासाठी आपल्या संघात कायम ठेवले. आरसीबीकडे भारताचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल, वेगवान गोलंदाज हर्षल पटेल व युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल असे आणखी पर्याय शिल्लक होते.

सिराजने जिंकले मन
या रिटेंशनमध्ये मोहम्मद सिराज याला ७ कोटी रुपये मिळाले. मात्र, त्याला एका नव्या फ्रेंचायझीकडून अधिक रकमेचा प्रस्ताव आला असतानाही त्याने आपल्या जुन्या संघासोबत राहणे पसंत केले. माध्यमातील वृत्तानुसार, नवी आयपीएल फ्रेंचायझी लखनौने त्याला १० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्याने हा प्रस्ताव धुडकावून लावत गेली चार वर्ष सातत्याने संधी देणाऱ्या आरसीबीसह राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे समाजमाध्यमांमध्ये चाहते कौतुक करत आहेत.

आरसीबीने दिली संधी
आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादसाठी खेळल्यानंतर सिराज २०१८ मध्ये आरसीबीमध्ये सामील झाला. पहिल्या दोन हंगामात तो अपयशी ठरला. मात्र, कर्णधार विराट कोहलीने सातत्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने या विश्वासाला पात्र ठरत मागील दोन हंगामात जबरदस्त कामगिरी करून दाखवली. आयपीएल २०२० नंतर त्याने ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण केले. सध्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार यानंतर त्याला भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानले जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

“ओ पाजी मै गिर गया”, मुंबई कसोटीसाठी ‘प्लेइंग ११’ निवडण्यावरून वसीम जाफरने शेअर केले मजेशीर मीम

हरभजन सिंगने निवडली कसोटीतील सर्वकालिक ‘प्लेइंग ११’, या खेळाडूला दिली विवियन रिचर्ड्सची उपाधी

आयपीएलमधील ३ दिग्गज ज्यांच्यावर आता बोली लागणं कठीण, कारकीर्द जवळपास संपुष्टात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---