---Advertisement---

IPL प्लेऑफ सामन्यांच्या वेळेवर ‘या’ दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न, म्हणाला…

On: गुरूवार, नोव्हेंबर 5, 2020 10:16 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० मधील प्लेऑफच्या सामन्यांना गुरुवारपासून सुरुवात झाली. प्लेऑफमधील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता तर युएईतील प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरु होणार आहेत. पण आता प्लेऑफच्या वेळेबद्दल दिग्गज क्रिकेटपटू टॉम मुडी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

त्यांनी ‘म्यूट मी’ या वेबसाईटशी बोलताना म्हटले आहे की ‘मागील २ आठवड्यांपासून आपण पाहात आहोत की इथे दव पडल्याने खेळावर परिणाम होत आहे. प्रत्येक कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत आहे. कारण पहिल्या डावात गोलंदाज चांगली गोलंदाजी करु शकतात.’

पुढे मुडी म्हणाले, ‘त्याचवेळी दुसऱ्या डावात गोलंदाजांकडे खास काही करण्यासारखे नसते. कारण त्यावेळी दव असल्याने गोलंदाजी करताना अडचण होत आहे.’ तसेच मुडी यांच्या म्हणण्यानुसार प्लेऑफचे सामने २ तास आधी म्हणजे युएईतील प्रमाणवेळेनुसार दुपारी ४ वाजता सुरु व्हायला पाहिजेत. ज्यामुळे दोन्ही संघासाठी सामन्यात सारखी परिस्थिती असेल.

मात्र मुडी यांच्या मताशी माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि इयान बिशप यांनी असहमती दर्शवली आहे. चोप्रा म्हणाला की आयपीएलमध्ये आणखीही काही बाबी आहेत ज्यांची काळजी घ्यायला हवी, मग ते आपल्याला आवडो किंवा न आवडो. परंतु व्यावसायीकरन हा खेळाचा एक भाग आहे. अशा परिस्थितीत आयोजकांना प्रेक्षकांची उपलब्धताही पाहावी लागते. टीव्ही प्रायोजकही यासाठी सहमत होणार नाही.’

चोप्राशी सहमती दर्शवताना इयान बिशप यांनी म्हटले की खेळाच्या विचारानुसार मुडी यांचा सल्ला चांगला आहे, खेळाडू देखील याबद्दल सहमत असतील. पण इथे मिलियन आणि बिलियन डॉलर्सचा प्रश्न आहे. त्यामुळे हे शक्य होणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

अश्विन खऱ्या अर्थाने बादफेरीचा प्लेअर, आम्ही नाही आकडेच सांगतायत हे

आयपीएलचा बाप तो बापच! शून्यावरती ३ बाद, मुंबईकडूनच मुंबईकरांची दांडी गुल

…म्हणून मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंनी दंडावर बांधली ‘काळी पट्टी’

ट्रेंडिंग लेख –

-आज वाढदिवस असणाऱ्या विराट कोहलीने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!

-‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!

-हॅप्पी बर्थडे विराट …!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---