पाकिस्तान क्रिकेट संघाचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील प्रवास खूपच खराब राहिला. त्यांना उपांत्य फेरीत जागा मिळवता न आल्याने ते स्पर्धेबाहेर फेकले गेले. बाबर आझम याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना इंग्लंडविरुद्ध गमावला. विश्वचषकातील पाकिस्तानचे खराब प्रदर्शन पाहून चोहोबाजूंनी संघ आणि कर्णधारावर टीका होत आहे. अशात आता पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तान संघाची या स्पर्धेतील कामगिरी अत्यंत सुमार राहिली. खास करून वेगवान गोलंदाज आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. त्या कामगिरीची जबाबदारी घेत संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
या विश्वचषक पाकिस्तान संघासाठी शाहीन आफ्रिदी याने सर्वाधिक 17 बळी मिळवले. मात्र यापैकी केव्हा चार बळी पहिल्या दहा षटकांमध्ये आले. हारिस रौफ व हसन अली हे संपूर्ण स्पर्धेत अत्यंत महागडे ठरले. तर अखेरच्या काही सामन्यांमध्ये संधी मिळालेल्या मोहम्मद वसीम याने चांगली कामगिरी केली.
(Morne Morkel has resigned as Pakistan bowling coach)
हेही वाचा-
गुरबाजने केलेली अहमदाबादच्या गरीब लोकांची मदत; पाहून शशी थरूरही म्हणाले, ‘हृदयासारखं तुझं करिअरही…’
पाकिस्तानी खेळाडूची राहुलविषयी ‘ही’ प्रतिक्रिया वाचून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान; म्हणाला, ‘जगातील…’