कोलकाता। आजपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांत संपूष्टात आला आहे.
भारताकडून या डावात वेगवान गोलंदाज इशांत शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत. ही त्याची कसोटीमध्ये एका डावात 5 विकेट्स घेण्याची 10 वी वेळ ठरली आहे.
त्यामुळे त्याने कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या यादीत जवागल श्रीनाथ यांची बरोबरी केली आहे. श्रीनाथ यांनीही 10 वेळा कसोटीत एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर कपिल देव असून त्यांनी 23 वेळी अशी कामगिरी केली आहे. तर झहिर खान या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. झहिरने 11 वेळा ही कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर भारतात कसोटी क्रिकेट खेळताना एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची इशांतची ही केवळ दुसरीच वेळ आहे.
विशेष म्हणजे त्याने भारतात पहिल्यांदा डिसेंबर 2007 मध्ये कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना खेळताना पाकिस्तान विरुद्ध बंगळूरु येथे 5 विकेट्स घेतल्या होत्या. म्हणजेच इशांतने भारतात जवळजवळ 12 वर्षांनंतर कसोटीमध्ये एका डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात 5+ विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज –
23 – कपिल देव
11 – झहिर खान
10 – इशांत शर्मा
10 – जवागल श्रीनाथ
कसोटी इतिहासात भारतीय वेगवान गोलंदाजांनी चौथ्यांदाच केला हा भीम पराक्रम
वाचा👉https://t.co/g6J9jWAnZE👈#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest— Maha Sports (@Maha_Sports) November 22, 2019
वृद्धिमान साहाने अफलातून कॅच तर घेतलेच पण हा मोठा पराक्रमही केलाय! https://t.co/66IMyae1k3#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest
— Maha Sports (@Maha_Sports) November 22, 2019