---Advertisement---

केएल राहुलच्या शिरपेचात मानाचा तुरा! अर्धशतक ठोकताच ‘या’ विक्रमात बनला तिसरा भारतीय

KL-Rahul
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) मेलबर्न येथे भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल चांगल्याच फॉर्मात दिसला. मागील सामन्याप्रमाणेच त्याने या सामन्यातही शानदार फलंदाजी केली आणि संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. राहुलने यादरम्यान अर्धशतक झळकावत एक खास विक्रम आपल्या नावावर केला.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी रोहित आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली. यावेळी रोहित 15 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर राहुलने एका बाजूने किल्ला लढवत धावफलक हलता ठेवला. पुढे त्याने दमदार फटकेबाजी करत अर्धशतकही झळकावले. राहुलने हे अर्धशतक 35 चेंडूत पूर्ण केले. यामध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांचाही समावेश होता.

या अर्धशतकासह राहुल टी20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला. त्याने आतापर्यंत 5 वेळा अर्धशतक झळकावले आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटने टी20 विश्वचषकात आतापर्यंत 13 वेळा अर्धशतके ठोकली आहेत. यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा असून त्याने 9 वेळा अशी कामगिरी केली आहे.

टी20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक अर्धशतके करणारे खेळाडू
13 अर्धशतके- विराट कोहली
09 अर्धशतके- रोहित शर्मा
05 अर्धशतके- केएल राहुल*

केएल राहुलची टी20 विश्वचषकातील कामगिरी
टी20 विश्वचषकातील सुरुवातीचे सामने केएल राहुल खूपच खराब फॉर्मात होता. मात्र, त्याने अखेरच्या सामन्यांमध्ये लय पकडली. राहुलने आतापर्यंत या विश्वचषकात भारताकडून पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 4 धावा, नेदरलँड्सविरुद्ध 9 धावा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावत पुनरागमन केले. त्याने यावेळी 50 धावा चोपल्या. यानंतर आता त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातही 51 धावा करत सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा पराभव गळ्याखाली घालणे कठीण…’, विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर बावुमाने ‘या’ गोष्टीला दिला दोष
टॉस जिंकत भारताचा बॅटिंगचा निर्णय, दिनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंतला मिळाली संधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---