चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवार(५ फेब्रुवारी) पासून सुरु झाला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात ७४ षटकांंत ६ बाद २५७ धावा केल्या आहेत. या डावात भारताकडून रिषभ पंतने तुफानी अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याचे शतक थोडक्यात हुकल्याने त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.
पंत या डावात ८८ चेंडू खेळताना ९१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ षटकार व ९ चौकार मारले. त्याला५७ व्या षटकात इंग्लंडचा गोलंदाज डोम बेसने जॅक लीचच्या हातून झेलबाद केले. पंतची ही नव्वदीमध्ये (९०ते९९धावांदरम्यान) बाद होण्याची चौथी वेळ आहे. त्यामुळे त्याने वयाच्या २३ वर्षांपर्यंत सर्वाधिकवेळा नव्वदीत बाद होणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. त्याने या नकोशा विक्रमाच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
सचिन वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत ३ वेळा नव्वदीत बाद झाला आहे. तर राहुल द्रविड, गौतम गंभीर, विराट कोहली, इरफान पठाण, दिनेश कार्तिक आणि के श्रीकांत हे प्रत्येकी २ वेळा वयाच्या २३ व्या वर्षांपर्यंत नव्वदीत बाद झाले आहेत. सध्या पंत २३ वर्षांचा आहे.
पंत ४ वेळा नव्वदीत बाद –
पंत मायदेशात ३ वेळा नव्वदीत बाद झाला आहे. तो सर्वात आधी सन २०१८ मध्ये राजकोट येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात तो ९२ धावांवर बाद झाला होता. तर त्याचवर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबाद येथे झालेल्या सामन्यातही अवघ्या ८ धावांनी त्याचे शतक हुकले होते. त्यावेळी को ९२ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर सध्या सुरु असलेल्या चेन्नई कसोटीत तो नव्वदीतच बाद झाला.
मायदेशाबाहेर तो एकदा नव्वदीत बाद झाला आहे. नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो सिडनी कसोटीत ९७ धावांवर बाद झाला होता.
चेतेश्वर पुजारासह ११९ धावांची भागीदारी
रिषभने चेन्नईत चालू असलेल्या कसोटी सामन्यात भारताची आवस्था ४ बाद ७३ धावा अशी असताना फलंदाजीला येत चेतेश्वर पुजारासह शतकी भागीदारी केली. त्याने आणि पुजाराने मिळून ५ व्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. पण दोघांचेही शतक हुकले. पुजारा ७३ धावांवर बाद झाला. पण त्यांच्या या भागीदारीमुळे भारताला तिसऱ्या दिवसाखेर २५० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतची ‘ही’ चूक बघून अश्विनने लावला डोक्याला हात, व्हिडिओ होतोय व्हायरल
रिषभ पंतने ५ षटकार ठोकत एमएस धोनीच्या ‘या’ मोठ्या विक्रमाची केली बरोबरी
दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहला खेळवू नये, माजी खेळाडूची मागणी