---Advertisement---

‘कर्णधार’ रुटचा २०२१ सालात कहर; आता पॉन्टींगचा ‘तो’ मोठा विश्वविक्रम आहे नजरेच्या टप्प्यात

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 9:39 AM
---Advertisement---

इंग्लड संघाचा कर्णधार सध्या भन्नाट फॉर्मात आहे. भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत त्याने तिसरे शतक झळकावले आहे. त्याने सध्या लीड्समध्ये सुरु असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करत अनेक विक्रम स्थापित केले आहेत. त्याने 2021 या वर्षी कर्णधार म्हणून सहा कसोटी शतक लगावली आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टीगच्या 2006 च्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून तो आता फक्त एक शतक दूर आहे. रिकी पॉन्टींगने कर्णधार म्हणून 2006 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सात कसोटी शतके लगावली होती.

एका कॅलेंडर वर्षात कर्णधार म्हणून सर्वात जास्त शतके लागवण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टीगच्या नावे आहे. त्याने 2006 मध्ये हा विक्रम केला होता. पॉन्टींगने 2005 मध्ये देखील एका कॅलेंडर वर्षात कर्णधार म्हणून सहा शतके केली होती. त्यांनंतर 2006 मध्ये त्याने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत सात शतके लगावली होती.

या यादीत पॉन्टींगसह ग्रॅमी स्मिथ आणि स्टीव्ह स्मिथ संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. दोघांनी एका कॅलेंडर वर्षात प्रत्येकी सहा शतके झळकावली आहे. आता जो रूटने देखील त्यांच्या सोबत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ग्रॅमी स्मिथने 2008 साली कर्णधार म्हणून सहा शतके लगावली होती, तर स्टीव्ह स्मिथने 2017 साली हा कारनामा केला होता.

जो रूटकडे आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टीगचा विक्रम मोडण्याची सुवर्ण संधी आहे. सध्या तो तुफान फॉर्मात आहे. याशिवाय या मालिकेतील अजून दोन कसोटी सामने शिल्लक आहेत. रुटची लय पाहता तो सहज या विक्रमास गवसणी घालू शकतो.

दुसरीकडे तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडकडून आतापर्यंत एक शतक तर तीन फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली आहेत. सलामीवीर रॉरी बर्न्सने 61 धावांची खेळी केली, तर हासीब हमीदने 68 धावांची खेळी केली. या दोघांनी 135 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या टी20 स्टार डेव्हिड मलाने 70 धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जो रुटने या मालिकेतलं सलग तिसरं शतक ठोकलं. त्याने 14 चौकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली.

त्यामुळे दुसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने 8 बाद 423 धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या इंग्लंडकडे 345 धावांची आघाडी आहे. भारताचा पहिला डाव 78 धावांवर संपुष्टात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

कर्णधार कोहलीच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच घडली नकोशी गोष्ट; इंग्लंडने स्वत:चाच विक्रम टाकला मागे

अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…

जगातील आजपर्यंतच्या सर्वश्रेष्ठ क्रिकेटरबद्दल १० माहित नसलेल्या गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---