आयपीएलच्या या मोसमात असे अनेक प्रसिद्ध गोलंदाज आहेत, ज्यांची जादू अद्याप चाललेली नाही. यातील अनेक गोलंदाज असे आहेत ज्यांना संघांनी करोडो रुपये देऊन विकत घेतलं होतं. मात्र अद्याप हे गोलंदाज आपल्या गोलंदाजीनं विशेष काही करू शकलेले नाहीत. उलट ते विकेट घेण्याऐवजी भरपूर धावा खर्च करतआहेत. चला तर मग, आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक धावा देणारे गोलंदाज कोणते ते जाणून घ्या.
एनरिक नॉर्किया – दिल्ली कॅपिटल्सच्या एनरिक नॉर्कियानं आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यानं 96 चेंडू टाकले. नॉर्किया हा या हंगामातील सर्वात महागडा गोलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत 13.43 च्या इकॉनॉमीनं 215 धावा दिल्या आहेत. शिवाय त्यानं 6 विकेट्सही घेतल्या आहेत.
हर्षल पटेल – पंजाब किंग्जच्या हर्षल पटेलनं आतापर्यंत पाच सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 120 चेंडू टाकले आहेत. त्यानं 10.55 च्या इकॉनॉमीसह 6 विकेट्स घेतल्या आहेत. हर्षल या मोसमातील दुसरा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्यानं आतापर्यंत 211 धावा दिल्या आहेत.
मोहम्मद सिराज – आरसीबीच्या मोहम्मद सिराजनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 114 चेंडू टाकले आहेत. त्याच्या नावे 10.11 इकॉनॉमीसह 4 बळी आहेत. आतापर्यंत सिराज या मोसमात सर्वाधिक धावा देणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. मोहम्मद सिराजनं आतापर्यंत 192 धावा दिल्या आहेत.
भुवनेश्वर कुमार – भुवनेश्वर कुमारनं या हंगामात आतापर्यंत पाच सामने खेळले. या पाच सामन्यांमध्ये त्यानं 120 चेंडू टाकले असून केवळ 3 विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वर या मोसमातील चौथा सर्वात महागडा गोलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत 191 धावा दिल्या आहेत.
राशिद खान – राशिद खाननं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांमध्ये त्यानं 120 चेंडू टाकले असून 5 विकेट्स घेतल्या आहेत. राशिद हा मोसमातील पाचवा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. राशिद खाननं आतापर्यंत 173 धावा दिल्या आहेत.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांचं वेतन
हर्षल पटेल – 11.75 कोटी रुपये
एनरिक नॉर्किया – 6.50 कोटी रुपये
मोहम्मद सिराज – 7 कोटी रुपये
भुवनेश्वर कुमार – 8.50 कोटी रुपये
राशिद खान – 15 कोटी रुपये
महत्त्वाच्या बातम्या-
भुवनेश्वर कुमारनं रचला इतिहास, अशी अनोखी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू