रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सोमवारी (१२ ऑक्टोबर) आयपीएल २०२०चा २८वा सामना झाला. फलंदाजीसाठी सोईस्कर असलेल्या शारजाह क्रिकेट स्टेडियमवर बेंगलोरच्या एबी डिविलियर्सने दमदार फटकेबाजी केली. त्यामुळे त्याने एक खास विक्रम त्याच्या नावावर केला आहे.
नाणेफेक जिंकत बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी निवडली आणि २० षटकात २ बाद १९४ धावा केल्या. दरम्यान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या यष्टीरक्षक फलंदाज डिविलियर्सने केवळ २३ चेंडूत ५० धावा कुटल्या. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये २३ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत डिविलियर्सने मारलेले हे ६वे अर्धशतक होते.
याबरोबरच डिविलियर्सने आयपीएलमध्ये २३ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत सर्वाधिक वेळा (६ वेळा) अर्धशतके मारणाऱ्या कायरन पोलार्डची बरोबरी केली आहे. या यादीत वीरेंद्र सेहवाग, यूसुफ पठान, ख्रिस गेल आणि डेविड वॉर्नर यांचाही समावेश आहे.
डिविलियर्सने त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत १६१ सामने खेळत ४६२३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये २३ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत सर्वाधिकवेळा अर्धशतक मारणारे फलंदाज
कायरन पोलार्ड- ६ वेळा
एबी डिविलियर्स- ६ वेळा
वीरेंद्र सेहवाग- ५ वेळा
यूसुफ पठान- ४ वेळा
ख्रिस गेल- ४ वेळा
डेविड वॉर्नर- ४ वेळा
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार यादव की राहुल तेवतिया, कोण खेळणार भारतीय संघात?
‘विराटकडून काही तरी शिका,’ बेंगलोरविरुद्धच्या दारुण पराभवानंतर सेहवागचा चेन्नईला टोला
‘त्या’ पुरस्कारासाठी तेवतियाला तब्बल ६ वर्ष पाहावी लागली वाट
ट्रेंडिंग लेख-
“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक
विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म
‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?