आयसीसीच्या प्रतिष्ठेच्या टी२० विश्वचषकात (T20 World Cup) भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvPAK) संघात टी२० विश्वचषकाचा चौथा सामना खेळवला गेला. यात टीम इंडियाने नाफेफेक जिंकत पाकिस्तानला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. भारतीय संघाची सुरुवात या सामन्यात जबरदस्त झाली. भारताकडून त्याच्या वैयक्तिक पहिल्या दोन षटकांतच दोन विकेट घेतल्या. त्याबरोबर विश्वचषकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो प्रग्यान ओझा नंतरचा दुसरा गोलंदाज बनला. परंतू त्याने ज्या बाबर आझम याला बाद केले, त्याच्या नावावर मात्र अतिशय खराब विक्रम जमा झाला.
बाबर आझम (Babar Azam) आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. गोल्डन डक अर्थात वैयक्तिक पहिलाच चेंडू खेळताना बाद होणे होय. आयसीसीच्या पुर्णवेळ सदस्य देशांमध्ये सर्वाधिक वेळा असा नकोसा विक्रम ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा सध्याचा टी२० कर्णधार ॲरॉन फिंच आतापर्यंत टी२०मध्ये ५वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. (Most Golden Ducks in T20I by Captain)
इतर खेळाडूंमध्ये बांगलादेशचा माजी कर्णधार मर्शफी मुर्तझा ४ वेळा बाद झाला, तर लसिथ मलिंगा श्रीलंकेचा कर्णधार असताना ३ वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. न्यूझीलंडचा सध्याचा कर्णधार केन विलियमसनही आतापर्यंत टी२०मध्ये ३ वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. आयर्लंडचा माजी कर्णधार विलियम पोर्टरफिल्डही आतापर्यंत ३ वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. भारताकडून कोणताही कर्णधार आतापर्यंत ३ किंवा अधिक वेळा टी२०मध्ये गोल्डन डकवर बाद झाला नाही.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डकवर बाद होणारे कर्णधार (पुर्णवेळ सदस्य देशांचे खेळाडू)
५- ॲरॉन फिंच
४- मर्शफी मुर्तझा
३- बाबर आझम
३- लसिथ मलिंगा
३- केन विलीयमसन
३- विलियम पोर्टरफिल्ड
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकदा नाही ‘इतक्या’ वेळा हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध घेतल्यात तीन विकेट्स, बनला खास यादीतील एकमेव भारतीय
मुस्कुराने की वजह तुम हो! पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याने दिली स्माईल, व्हिडिओ व्हायरल