---Advertisement---

IPL | भुवनेश्वर सर्वाधिक मिडन ओव्हर्स टाकणारा दुसराच, पाहा कोण आहे ‘नंबर वन’

Bhuvneshwar-Kumar
---Advertisement---

मुंबई। मंगळवारी (१७ मे) वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ६५ वा सामना झाला. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ३ धावांनी अखेरच्या षटकात विजय मिळवला. हैदराबादच्या या विजयात भुवनेश्वर कुमारचाही मोठा वाटा राहिला.

भुवनेश्वरचा मोठा विक्रम
सनरायझर्स हैदराबाद संघाने (Sunrisers Hyderabad) मुंबई इंडियन्सला १९४ धावांचे आव्हान दिले होते. या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला शेवटच्या दोन षटकात १९ धावांची गरज होती. पण, हैदराबादकडून १९ वे षटक अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार घेऊन आला. त्याने आपल्यावरील जबाबदारी योग्यप्रकारे सांभाळत या संपूर्ण षटकात एकही धाव दिली नाही. त्याचबरोबर त्याने मुंबईच्या संजय यादवला बाद केले.

भुवनेश्वरची (Bhuvneshwar kumar) निर्धाव षटक टाकण्याची ही आयपीएलमधील ११ वी वेळ होती. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने इरफान पठाणला मागे टाकले आहे. इरफानने १० षटके आयपीएलमध्ये निर्धाव टाकली होती. या यादीत प्रविण कुमार (Praveen Kumar) १४ निर्धाव षटकांसह अव्वल क्रमांकावर आहे (Most Maiden Overs bowled in IPL).

भुवनेश्वरने हे षटक निर्धाव टाकलेले असल्याने मुंबईला शेवटच्या ६ चेंडूत १९ धावांचीच गरज होती. पण, मुंबईला या षटकात १५ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांचा ३ धावांनी पराभव झाला.

सनरायझर्सने मिळवला विजय 
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे हैदराबादनेही प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १९३ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तसेच प्रियम गर्गने ४२ धावांचे आणि निकोलस पूरनने ३८ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून रमनदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी शानदार सुरुवात केली. या दोघांनीही ९५ धावांची भागीदारी केली. पण, दोघांनाही त्यांचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही. रोहित ४८ आणि इशान किशन ४३ धावांवर बाद झाले. त्यानंतर टीम डेव्हिनने तुफानी खेळासह ४६ धावा करताना मुंबईला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण, तो धावबाद झाला. अखेर मुंबईला २० षटकात ७ बाद १९० धावाच करता आल्याने पराभव झाला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

उमरान मलिकने मुंबई इंडियन्सच्या तीन विकेट्स घेत बुमराहला पछाडलं, ‘या’ विक्रमात बनला अव्वल

‘त्याला सीपीआर दिला, वाचवण्यासाठी अगदी…’, बघा सायमंडच्या शेवटच्या क्षणी काय काय घडलं

प्लेऑफच्या शर्यतीत संघ असतानाच कर्णधार मायदेशी रवाना, हैदराबादच्या ताफ्यात गडबड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---