कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळताना टिच्चून फलंदाजी करणारे ५ फलंदाज

१९९६मध्ये अर्थात २३ वर्षापुर्वी राहुल द्रविडने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिला चेंडू खेळला होता. पहिल्याच सामन्यात ९५ धावा करताना त्याने तब्बल २६७ चेंडू खेळले होते. त्यानंतर टिच्चून फलंदाजी करताना धावसंख्येला कसा आकार द्यायचा हे त्याने दाखवुन दिले. पुढे राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल ४६५६३ चेंडू खेळले.

परंतु आपण या लेखात अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी कसोटीत सर्वाधिक चेंडू खेळले आहेत.

कसोटी कारकिर्दीत सार्वधिक चेंडू खेळणारे खेळाडू (Most Balls Faced in Test Cricket)

#५ अॅलन बॉर्डर (Allan Border)
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार आणि एकवेळचा कसोटीमध्ये सर्वाधिक धावा तसेच शतकांचा विक्रम आपल्या नवे करणारा अॅलन बॉर्डर कसोटी कारकिर्दीत १५६ कसोटी सामने खेळला असून त्याने २७,००२ चेंडूंचा सामना केला आहे. एवढे चेंडू खेळून बॉर्डरने ५०.५६ च्या सरासरीने ११,१७४ धावा केल्या आहेत.

#४ शिवनारायन चंद्रपॉल (Shivnarine Chanderpaul)
वेस्ट इंडिजचा महान फलंदाज शिवनारायन चंद्रपॉल हा क्रमवारीत ४थ्या क्रमांकावर असून त्यानेही द्रविड इतकेच अर्थात १६४ सामने खेळले आहे. परंतु त्याने २७,३९५ चेंडूंचा कसोटी कारकिर्दीत सामना केला आहे. २१ वर्षांच्या दीर्घ अशा कारकिर्दीत त्याने ११, ८६७ धावा सुद्धा केल्या आहेत.

#३ जॅक कॅलिस (Jacques Kallis)
जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसने १६६ सामन्यात २८, ९०३ चेंडू खेळले आहेत. विशेष म्हणजे द्रविडपेक्षा दोन कसोटी सामने कमी खेळणाऱ्या कॅलिसने द्रविडपेक्षा बरोबर एक धाव कसोटी कारकिर्दीत जास्त काढली आहे. याबरोबर त्याने गोलंदाजी करताना २०३२३ चेंडू टाकले आहेत.

#२ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर सार्वधिक कसोटी सामने तसेच एकदिवसीय सामने खेळण्याचं रेकॉर्ड आहे. द्रविडपेक्षा सचिन तब्बल ३६ कसोटी सामने जास्त खेळूनही सचिन त्यापेक्षा जवळजवळ २००० चेंडू कमी खेळला आहे. २९,४३७ चेंडू खेळताना सचिनने धावा केल्या आहेत १५,९२१. त्या द्रविडपेक्षा २००० ने जास्त आहेत.

#१ राहुल द्रविड (Rahul Dravid)

भारताच्या या महान फलंदाजाने १९९६ ते २०१२ या दीर्घ कसोटी कारकिर्दीत तब्बल ३१,२५८ चेंडू खेळले. यासाठी त्याला १६४ कसोटी सामने खेळावे लागले. या ३१,२५८ चेंडूत द्रविडने १३,२८८ एवढ्या धावा केल्या. यात त्याचा स्ट्राइक रेट होता फक्त ४२.५१ परंतु सरासरी ही अतिशय चांगली अर्थात ५२. ३१ राहिली.

अशाच काही मनोरंजक आकडेवारी-

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारे ५ गोलंदाज, पहिल्या स्थानावर आहे एक भारतीय

रनमशीन विराट कोहलीसाठी हे ५ विक्रम मोडणं जरा कठीणच

टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू

४ मराठमोळे खेळाडू ज्यांनी केल्या आहेत क्रिकेटमध्ये १०हजारपेक्षा जास्त धावा

या ५ खेळाडूंना आहे वनडेत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय

You might also like