कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारे ५ गोलंदाज, पहिल्या स्थानावर आहे एक भारतीय

कसोटी क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याचबरोबर धावांचे डोंगरही रचले आहे. गोलंदाजांनाही अनेक फलंदाजांना जखडून ठेवत विकेट्स घेतलेल्या आहेत.

विशेष म्हणजे जे गोलंदाज कसोट क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ खेळले त्यांनी ओघानेच जास्त षटके गोलंदाजी केली. त्यामुळे ओघानेच त्यांनी इतर गोलंदाजांपेक्षा जास्त धावाही दिल्या असणार.

तर या लेखात अशाच गोलंजांवर आपण चर्चा कऱणार आहोत ज्यांनी कसोटीत सर्वाधिक धावा दिल्या आहेत.

५. स्टुअर्ट ब्राॅड

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्राॅडने २००७मध्ये कसोटी पदार्पण केले. त्यानंतर आजपर्यंत तो १३८ कसोटी सामने खेळला आहे. ज्या गोलंदाजाला युवराजने एकाच षटकात ६ षटकार मारले तो गोलंदाज पुढे १३८ कसोटी सामने खेळेल असे कुणालाही वाटले नव्हते. स्वत: युवराज केवळ ४० कसोटी सामने खेळला आहे तर. असो. स्टुअर्ट ब्राॅडने कसोटीत एकूण २८०७९ चेंडू टाकले असून त्याने १३८२७ धावा दिल्या आहेत. त्याने षटकामागे सरासरी २.९५ने धावा दिल्या आहेत. त्याने १३८ कसोटीत ४८५ विकेट्स घेतल्या आहेत.

४. जेम्स अॅंडरसन

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून जेम्स अॅंडरसनकडे पाहिले जाते. त्याने १५१ कसोटीत ५८४ विकेट्स घेतल्या आहे. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. त्याने कसोटीत ३२७७९ चेंडूत षटकामागे २.८६च्या सरासरीने १५६७० धावा दिल्या आहेत. या यादीत तो चौथ्या स्थानी आहे.

३. शेन वाॅर्न

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वाॅर्नने १४५ कसोटी सामन्यांत ७०८ विकेट्स घेतल्या आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसरा आहे. या १४५ कसोटीत त्याने ४०७०५ चेंडू टाकले असून षटकामागे २.६५च्या सरासरीने १७९९५ धावा दिल्या आहेत. फिरकीपटूला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक काळ गोलंदाजी करावी लागते हे क्रिकेट जाणकारांना माहित आहेच. यामुळे बऱ्याच वेळा वेगवान गोलंदाजांना विश्रांतीही मिळते.

२. मुथय्या मुरलीधरन

कसोटी क्रिकेटमध्ये ८०० विकेट्स घेणारा जगातील एकमेव गोलंदाज अर्थातच मुथय्या मुरलीधरन. त्याने १३३ कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना ४४०३९ चेंडू टाकले आहेत. अंदाजे प्रत्येक सामन्यात ५५ षटके. तसेच त्याने कसोटीत षटकामागे २.४७च्या सरासरीने १८१८० धावाही दिल्या आहेत.

१. अनिल कुंबळे

कसोटी क्रिकेटमध्ये कारकिर्दीत जसा धावा करण्यात भारताचा सचिन तेंडूलकर अव्वल स्थानी आहे, तसेच कसोटी क्रिकेटमध्ये कारकिर्दीत धावा देण्यासारख्या नकोशा विक्रमात अनिल कुंबळे पहिल्या स्थानी आहे. कुंबळेने १३२ कसोटी सामन्यांत तब्बल ६१९ विकेट्स घेतल्या आहेत. परंतु याचबरोबर ४०८५० चेंडू देखील गोलंदाजी केली आहे. यात त्याने षटकामागे २.६९च्या सरासरीने १८३५५ धावा दिल्या आहेत.

अशाच काही मनोरंजक आकडेवारी-

रनमशीन विराट कोहलीसाठी हे ५ विक्रम मोडणं जरा कठीणच

टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू

४ मराठमोळे खेळाडू ज्यांनी केल्या आहेत क्रिकेटमध्ये १०हजारपेक्षा जास्त धावा

या ५ खेळाडूंना आहे वनडेत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय

You might also like