ऍडलेड। भारताचा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 299 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती.
त्यांनी पहिल्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारीही रचली. परंतू खेळपट्टिवर स्थिरावत असतानाच धवन 32 धावांवर बाद झाला. मात्र तरीही रोहित आणि शिखर यांनी एक खास विक्रम केला आहे.
रोहित आणि शिखर या जोडीने वनडेत सलामीला एकत्र फलंदाजी करताना 4000 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारी ही जगातील चौथ्या क्रमांकाची सलामीवीरांची जोडी ठरली आहे. तसेच हा टप्पा पार करणारी यांची दुसरीच भारतीय सलामीवीरांची जोडी आहे.
त्यांनी सलामीला एकत्र फलंदाजी करताना 90 डावात 45.39 च्या सरासरीने 4040 धावा केल्या आहेत. याआधी हा टप्पा सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली, ऍडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन आणि गोर्डन ग्रिनिज आणि देसमंड हाईन्स या सलामीवीरांच्या जोडीने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–रोहित आऊट तर झाला पण इतिहासात कायमच नाव कोरुन
–जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाला केले अफलातून धावबाद, पहा व्हिडिओ
–एमएम धोनीसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा वनडे या कारणासाठी आहे खास