अॅडलेड। आजपासून(6 डिसेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरु झाला आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताच्या फलंदाजीची सुरुवात काहीशी अडखळतच झाली आहे. कारण भारताने केएल राहुल, मुरली विजय, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी 50 धावांच्या आतच विकेट गमावल्या होत्या.
कर्णधार विराट कोहली 3 धावांवर असतानाच 11 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिंन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. कोहलीचा झेल गलीमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या उस्मान ख्वाजाने घेतला. असे असले तरी कोहलीने एक खास विक्रम केला आहे.
तो आॅस्ट्रेलियन भूमीत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियाई कर्णधार ठरला आहे. त्याने कर्णधार म्हणून आॅस्ट्रेलियामध्ये कसोटीत 3 सामन्यातील 5 डावात 452 धावा केल्या आहेत.
हा विक्रम करताना त्याने पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. इम्रान खान यांनी कर्णधार म्हणून आॅस्ट्रेलियामध्ये कसोटीत 5 सामन्यातील 9 डावात 449 धावा केल्या होत्या.
तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचाच मोहम्मद युसुफ असून त्याने 5 सामन्यातील 10 डावात मिळून 339 धावा केल्या आहेत.
आॅस्ट्रेलियन भूमीत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे आशियाई कर्णधार-
452 – विराट कोहली
449 – इम्रान खान
339 – मोहम्मद युसुफ
महत्त्वाच्या बातम्या-
–कसोटीत या गोलंदाजाने रोहित शर्माची घेतली आहे सर्वाधिक वेळा विकेट
–धोनीमुळे मी निवृत्ती घेतलेली नाही- व्हिव्हिएस लक्ष्मण
–Video: उस्मान ख्वाजाने घेतला किंग कोहलीचा अप्रतिम झेल