---Advertisement---

२०१९ अखेरीस टी२०मध्ये विराट-रोहितचे पारडे समान!

---Advertisement---

2019 वर्षात विराट कोहली(Virat Kohli) आणि रोहित शर्मा(Rohit Sharma) या भारताच्या कर्णधार आणि उपकर्णधारामध्ये आंतरराष्ट्रीय टी20त सर्वाधिक धावा करण्याची चुरस सुरु होती. यामध्ये कधी विराटने बाजी मारली, तर कधी रोहित सरस ठरला. पण 2020 सुरु होईपर्यंत तरी अखेर या दोघांचे पारडे समान झाले आहेत.

सध्या हे दोघेही संयुक्तरित्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान झाले आहेत.

बुधवारी(11 डिसेंबर) भारताने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 67 धावांनी पराभव केला. या सामन्यात रोहितने 34 चेंडूत 71 धावा केल्या आणि विराटने 29 चेंडून नाबाद 70 धावांची खेळी केली. त्यामुळे आता या दोघांच्याही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये प्रत्येकी 2633 धावा झाल्या आहेत. 

विराटने टी20मध्ये 75 सामन्यात 52.66 च्या सरासरीने 2633 धावा केल्या आहेत. तसेच रोहितने 104 सामन्यात 32.10 च्या सरासरीने 2633 धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे बुधवारी झालेला टी20 सामना हा भारताचा 2019 या वर्षातील शेवटचा टी20 सामना होता. आता भारतीय संघ थेट जानेवारी 2020मध्ये श्रीलंका विरुद्ध टी20 सामना खेळेल. त्यामुळे 2019 अखेरपर्यंत तरी रोहित आणि विराट आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर राहणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---