मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने चेन्नई सुपर किंग्ज खेळताना एक खास विक्रम केला. आयपीएलच्या एका हंगामात ७०० धावा करणारा तो ६वा खेळाडू ठरला आहे.
यापुर्वी विराट कोहली (९७३ धावा, २०१६), डेविड वार्नर (८४८ धावा, २०१६), ख्रिस गेल (७३३ धावा, २०१२), माईक हसी (७३३ धावा, २०१३), ख्रिस गेल (७०८ धावा, २०१३) यांनी हा पराक्रम केला आहे.
केन विलियमसने १७ सामन्यात ५६.५३च्या सरासरीने ७३५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ८ अर्धशतकांचा समावेश आहे. यावर्षीच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे.
आणि त्याने या हंगामातील आॅरेंज कॅप मिळवली आहे. कारण अंतिम फेरीत खेळत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा अंबाती रायडू विल्यम्सनपेक्षा १४९ धावांनी मागे आहे तर चेन्नईला जिंकायला १७९ धावांची गरज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रायडूकडून १४९ धावा होणे केवळ अशक्य आहे. त्यात सलामीवीर चांगले खेळत असल्यामुळे हा विक्रम होणे केवळ अशक्य आहे.
यामुळे विलियमसनला स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणुन १० लाख रुपये मिळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-सचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला
–लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी
–आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस
–त्या शाॅटवर षटकार नाही तर अष्टकारचं द्या!
–आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात खास विक्रम रैना आज करणार!
-तर धोनी करणार ४८ तासांत तो विक्रम आपल्या नावावर!