---Advertisement---

भारताचा ‘सूर्य’ नव्याने लिहितोय इतिहास! श्रीलंकन गोलंदाजांचा बाजार उठवत रचला मोठा विक्रम

Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना शनिवारी (दि. 07 जानेवारी) खेळला गेला. राजकोट येथील सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. त्याने यादरम्यान शतक झळकावत खास विक्रम आपल्या नावावर नोंदवला. त्याने युवराज सिंग आणि विराट कोहली यांच्यापेक्षा जास्त वेळा अशी कामगिरी करण्याचा मान मिळवला आहे. चला पाहूयात सूर्यकुमारचा विक्रम…

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी प्राथमिकरीत्या योग्य ठरवला. यावेळी फलंदाजी करताना भारतीय संघाला पहिला धक्का ईशान किशन (1) याच्या रूपात पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर बसला. त्यानंतर राहुल त्रिपाठी याने शुबमन गिल याला साथ दिली. मात्र, तो जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. तो 35 धावा करत सहाव्या षटकात बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फलंदाजीला उतरला.

सूर्यकुमार यादवचा विक्रम
यावेळी सूर्यकुमारने गिलसोबत 53 चेंडूत 111 धावांची भागीदारी रचली. मात्र, गिल 46 धावांवर 14.4 षटकात बाद झाला. पुढे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होऊन तंबूत जात राहिले, पण सूर्यकुमार मात्र टिच्चून फलंदाजी करत होता. सूर्याने यावेळी फलंदाजी करताना अवघ्या 45 चेंडूत शतक साजरे केले. हे शतक करताना त्याने 7 चौकार आणि 8 षटकार मारले होते. तो या सामन्यात शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने या सामन्यात 51 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि एकूण 9 षटकारांच्या मदतीने नाबाद 112 धावा चोपल्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील तिसरे शतक होते. यासोबतच त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला.

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सलामीला न येता सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादवने नव्याने आपली जागा बनवली. सूर्यकुमार 9 षटकार ठोकत युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या खूप पुढे गेला.

या यादीत सूर्यकुमारचे नाव दोन वेळा येते. त्याने 2022 या वर्षात एकदा वेस्ट इंडिजविरुद्ध आणि दुसऱ्यांदा न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 डावात प्रत्येकी 7 षटकार मारले होते. त्याच्याआधी विराटने 2019मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 7 षटकार मारले होते. तत्पूर्वी हा विक्रम युवराजच्या नावावर होता. युवराजने 2007मध्ये इंग्लंडविरुद्ध आणि 2012मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी20 डावात प्रत्येकी 7 षटकार खेचले होते. (Most sixes by Indian non-openers in a men’s T20I innings Suryakumar yadav in the list)

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सलामीला न येता सर्वाधिक षटकार खेचणारे भारतीय फलंदाज
9 षटकार- सूर्यकुमार यादव, विरुद्ध- श्रीलंका (2023)*

7 षटकार- युवराज सिंग, विरुद्ध- इंग्लंड (2007)
7 षटकार- युवराज सिंग, विरुद्ध- पाकिस्तान (2012)
7 षटकार- विराट कोहली, विरुद्ध- वेस्ट इंडिज (2019)
7 षटकार- सूर्यकुमार यादव, विरुद्ध- वेस्ट इंडिज (2022)
7 षटकार- सूर्यकुमार यादव, विरुद्ध- न्यूझीलंड (2022)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अशी राहिलीये टीम इंडियाच्या नव्या निवडसमिती सदस्यांची खेळाडू म्हणून कारकीर्द; अनुभवाच्या बाबतीत…
वनडेत द्विशतक मारलेला ईशान टी20 मध्ये ठरतोय फिसड्डी! आकडे दाखवतायेत वस्तुस्थिती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---