नॉटिंगघम। आज(31 मे) 2019 विश्वचषकातील दुसरा सामना विंडीज विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. केवळ 35.2 षटकांमध्ये संपलेल्या या सामन्यात विंडीजने 7 विकेट्सने विजय मिळवला. तसेच या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा विंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने खास विश्वविक्रमही केला आहे.
त्याने या सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजकडून 34 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले.
त्यामुळे गेलने वनडे विश्वचषकात 40 षटकार मारण्याचा टप्पा पार केला आहे. 40 षटकारांचा हा टप्पा गाठणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. 5 वा विश्वचषक खेळणाऱ्या गेलचे आता विश्वचषकात 27 सामन्यात 40 षटकार झाले आहेत.
यापूर्वी वनडे विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम गेल आणि एबी डिविलियर्सच्या नावावर संयुक्तपणे होता. पण आता गेलने डिविलियर्सला मागे टाकले आहे. डिविलियर्सने त्याच्या कारकिर्दीत 3 विश्वचषक खेळताना 37 षटकार मारले आहेत.
आज पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 21.4 षटकात सर्वबाद 105 धावा केल्या. त्यांच्याकडून फकार जामन(22), बाबर आझम(22), मोहम्मद हाफिज(16) आणि वहाब रियाज(18) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली.
विंडीजकडून गोलंदाजीत ओशान थॉमसने सर्वाधिक 4 विकेट घेतली. तसेच कर्णधार जेसन होल्डरने 3 विकेट्स, आंद्रे रसलने 2 विकेट्स आणि शेल्डन कॉटरेलने 1 विकेट घेतली.
त्यानंतर 106 धावांच्या आव्हानाचा पाठलाग विंडीजने गेलच्या अर्धशतकाच्या जोरावर 13.4 षटकात सहज पूर्ण केले. विंडीजकडून निकोलस पूरननेही 19 चेंडूत नाबाद 34 धावांची तुफानी छोटेखानी खेळी करत या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
पाकिस्तानकडून गोलंदाजीत मोहम्मद अमीरने तीन विकेट्स घेतल्या.
वनडे विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
40 षटकार – ख्रिस गेल
37 षटकार – एबी डिविलियर्स
31 – रिकी पँटिंग
29 – ब्रेंडन मॅक्यूलम
28 – हर्षल गिब्स
27 सनथ जयसुर्या/सचिन तेंडुलकर
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–प्रतिस्पर्धी खेळाडूंना धावबाद करण्यासाठी टीम इंडिया करतीय कसून सराव, पहा व्हिडिओ
–Video: विराट करतोय गोलंदाजीचा सराव, चाहत्यांनी दिला खास सल्ला
–विश्वचषक २०१९: आज होणाऱ्या विंडीज विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा असा आहे इतिहास






