---Advertisement---

…म्हणून रोहित शर्मा आहे सिक्सर किंग, हा आहे पुरावा

On: बुधवार, डिसेंबर 18, 2019 4:59 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। आज(18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात दुसरा वनडे सामना होत आहे. या सामन्यात रोहित शर्माने(Rohit Sharma) दिडशतक पूर्ण केले आहे. रोहितने 138 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांसह 159 धावा केल्या. याबरोबरच त्याने खास विश्वविक्रम केला आहे.

रोहितचे 2019 या वर्षात 77 षटकार झाले आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू(Most Sixes in International matches in a calendar year) ठरला आहे.

विशेष म्हणजे त्याने स्वत:चाच विश्वविक्रम मोडला आहे. रोहितने 2018 या वर्षात 74 षटकार मारले होते. त्यामुळे त्याने त्याच्या मागील वर्षीच्या या विक्रमाला मागे टाकले आहे.

तसेच रोहित सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू ठरला आहे. तो 2017 आणि 2018 मध्येही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू होता. त्याने 2017 ला  65 षटकार मारले होते.

याचबरोबर रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 70 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा सध्यातरी जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. खास गोष्ट म्हणजे त्याने हा कारनामा 2018 आणि 2019 असे सलग 2 वर्षे केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –

77 षटकार – रोहित शर्मा – 2019*

74 षटकार – रोहित शर्मा – 2018

65 षटकार – रोहित शर्मा – 2017

63 षटकार – एबी डिविलियर्स – 2015

60 षटकार – ओएन मॉर्गन – 2019

59 षटकार – ख्रिस गेल – 2012

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---