---Advertisement---

विस्फोटक रसेलचा भीमपराक्रम! टी20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा तिसराच खेळाडू

On: शुक्रवार, मे 5, 2023 1:32 PM
Andre-Russell
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल 2023च्या 47व्या सामन्यात 18 धावांनी पराभूत केले. कोलकाताने अखेरच्या षटकात हा सामना आपल्या नावावर केला. या सामन्यात कोलकाताकडून आंद्रे रसेल याने 15 चेंडूत 24 धावांची खेळी साकारली. यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. जरी रसेलने या सामन्यात मोठी खेळी साकारली नाही, पण त्याने टी20 क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला. रसेलने टी20 क्रिकेटमध्ये 600 षटकार मारण्याचा पराक्रम केला. तो अशी कामगिरी करणारा तिसरा खेळाडू बनला.

आंद्रे रसेल (Andre Russell) याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोन षटकार मारताच तो टी20 क्रिकेटमध्ये 600 षटकार (Kieron Pollard 600 Six) मारणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला. रसेलच्या पुढे अव्वलस्थानी त्याचाच माजी संघसहकारी ख्रिस गेल (Chris Gayle) आहे. गेलने टी20 क्रिकेटमध्ये एक हजारहून अधिक षटकार मारले आहेत. गेलच्या नावावर 1056 षटकारांची नोंद आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानीही वेस्ट इंडिजचाच खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आहे. पोलार्डने टी20 क्रिकेटमध्ये 813 षटकार मारले आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे अव्वल 3 खेळाडू वेस्ट इंडिजचे आहेत. या यावरून स्पष्ट होते की, क्रिकेटजगतात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा दबदबा आहे. यादीत चौथ्या स्थानी 485 षटकारांसह ब्रेंडन मॅक्युलम आहे. तसेच, 480 षटकारांसह पाचव्या स्थानी कॉलिन मुन्रो आहे. दुसरीकडे, भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचं झालं, तर टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा याचा सहावा क्रमांक लागतो. रोहितने टी20 क्रिकेटमध्ये 472 षटकार मारले आहेत.

याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने आयपीएलमध्ये 357 षटकार मारले आहेत. त्याच्यानंतर एबी डिविलियर्सने 251 आणि रोहितने 250 षटकार मारले आहेत. दुसरीकडे, रसेलने आयपीएलमध्ये 188 षटकारही मारले आहेत.

सामन्याविषयी बोलायचं झालं, तर कोलकाताने हैदराबादला 5 धावांनी पराभूत केले. हैदराबादला अखेरच्या षटकात 9 धावांची आवश्यकता होती. मात्र, वरुण चक्रवर्ती याने रहस्यमयी गोलंदाजी करून अखेरच्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आणि संघाला शानदार विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. वरुणने 4 षटके गोलंदाजी करत 20 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट नावावर केली. (most sixes in t20 cricket andre russell hits 600th t20 career six read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटला ठोठावलेला 1.07 कोटींचा दंड, पण पठ्ठ्या एक रुपड्याही नाही देणार; RCB उचलणार खर्च! कारण वाचाच
आतल्या गोटातील बातमी! अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार भारत-पाकिस्तानचा आमना-सामना? वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---