भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी खिशात घातला. या विजयात भारतीय संघाच्या सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. मात्र, या सर्वांमध्ये रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल आणि रोहित शर्मा हे चार खेळाडू भलतेच चमकले. त्यातही जडेजाने पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात केलेल्या दिमाखदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, या पुरस्कारासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. चला तर जडेजाने नेमका काय विक्रम केलाय जाणून घेऊया…
जडेजाची कसोटीतील कामगिरी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील कसोटी सामन्यातून जवळपास 6 महिन्यांनंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पुनरागमनाच्या सामन्यातच जडेजा चमकला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 22 षटकात 47 धावा खर्च करत सर्वाधिक 5 विकेट्स नावावर केल्या. त्यानंतर त्याने भारताच्या डावात शानदार फलंदाजी करत 185 चेंडूत 70 धावाही चोपल्या. या धावा करताना त्याने 9 चौकारही मारले. त्याच्या धावांच्या जोरावर भारतीय संघाने सर्वबाद 400 धावा धावफलकावर लावल्या.
An all-round match-winning performance to mark a memorable return! ????????@imjadeja becomes the Player of the Match as #TeamIndia win by an innings & 132 runs ????????
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/VBGfjqB4dZ
— BCCI (@BCCI) February 11, 2023
यानंतर भारताच्या 223 धावांची आघाडी घेताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 91 धावांवरच संपुष्टात आला. दुसऱ्या डावात जडेजाने 12 चेंडूत 34 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे त्याने सामन्यात एकूण 7 विकेट्स घेतल्या आणि 70 धावांचे योगदान दिले. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावणारा तिसरा भारतीय
हा पुरस्कार पटकावताच जडेजाच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. जडेजा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार पटकावणारा भारताचा तिसरा खेळाडू ठरला. त्याने आतापर्यंत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांमध्ये एकूण 3 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. या यादीत पहिल्या स्थानी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा सामनावीर पुरस्कार नावावर केला आहे. यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) असून त्याने 4 वेळा हा पुरस्कार नावावर केला आहे.
या यादीत संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी चार भारतीय खेळाडू आहेत. त्यात एमएस धोनी (MS Dhoni), झहीर खान (Zaheer Khan), व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आणि कपिल देव (Kapil Dev) यांचा समावेश आहे. या चारही खेळाडूंनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत 2 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. (Most Test Man of the Match Awards for India vs Australia ravindra jadeja at 3rd rank)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावणारे भारतीय
5 वेळा- सचिन तेंडुलकर
4 वेळा- चेतेश्वर पुजारा
3 वेळा- रवींद्र जडेजा*
2 वेळा- एमएस धोनी
2 वेळा- झहीर खान
2 वेळा- व्हीव्हीएस लक्ष्मण
2 वेळा- कपिल देव
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी सध्या खूपच घाबरलेलो आहे…’, पहिल्या कसोटीत विकेट्सचा पाऊस पाडणाऱ्या अश्विनचे खळबळजनक विधान
रोहितवरच फोकस करत होता कॅमेरामन, कॅप्टनची सटकताच दिली ‘अशी’ रिऍक्शन; म्हणाला, ‘अरे ये…’






