---Advertisement---

न्यूझीलंडसाठी कसोटीमध्ये रॉसच ठरला बॉस!

---Advertisement---

वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आज(22 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 71.1 षटकात 5 बाद 216 धावा केल्या आहेत. तसेच 51 धावांची आघाडी घेतली आहे.

या डावात न्यूझीलंडकडून अनुभवी फलंदाज रॉस टेलरने 71 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारासह 44 धावांची खेळी केली. तसेच केन विलियम्सनबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारीही केली. त्याचबरोबर टेलरने एक मोठा विक्रम केला आहे.

तो आता न्यूझीलंडकडून कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याचे आता कसोटीमध्ये 100 सामन्यात 46.26 च्या सरासरीने 7218 धावा झाल्या आहेत. त्यामुळे त्याने न्यूझीलंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग यांना मागे टाकले आहे. फ्लेमिंग यांनी 111 कसोटीत 7172 धावा केल्या आहेत.

विशेष म्हणजे टेलरचा हा कारकिर्दीतील 100 वा सामना आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी20 या तीन्ही प्रकारात प्रत्येकी 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

तसेच तो 100 कसोटी सामने खेळणारा न्यूझीलंडचा चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी न्यूझीलंडकडून डॅनिएल विट्टोरी(112), स्टिफन फ्लेमिंग(111) आणि ब्रेंडन मॅक्यूलम(101) यांनीच 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

कसोटीमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू – 

7218 – रॉस टेलर (100 सामने)

7172 – स्टिफन फ्लेमिंंग (111 सामने)

6468 – केन विलियम्सन (79 सामने)

6453 – ब्रेंडन मॅक्यूलम (101 सामने)

5444 – मार्टिन क्रो (77 सामने)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---