---Advertisement---

६० कसोटी सामने खेळूनही एकही मॅन ऑफ द मॅच नशीबात नसलेले क्रिकेटपटू

On: मंगळवार, एप्रिल 21, 2020 8:23 PM
---Advertisement---

क्रिकेट सामन्यात खेळाडूंनी केलेल्या कामगिरीला मोठे महत्त्व असते. त्याची कामगिरी सामनावीर पुरस्कार देताना लक्षात घेतली जात असते. साधारण जो खेळाडू त्याच्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करतो, त्याला हा पुरस्कार दिला जातो.

बऱ्याचदा तर विजयी संघाकडून चांगली आणि महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार दिला जातो. पण काही वेळा किंवा खूप क्वचित असे होते की पराभूत होणाऱ्या संघातील एखाद्या खेळाडूला त्याच्या चांगल्या कामगिरीबद्दल सामनावीराचा पुरस्कार दिला जातो.

परंतु काही क्रिकेटपटू असेही आहे ज्यांनी ६० किंवा अधिक कसोटी सामने खेळूनही त्यांना कधीही सामनावीर पुरस्कार मिळाला नाही.

मुळात तुम्ही चांगली कामगिरी केली तरच तुम्हाला एवढे सामने खेळायला मिळतात, परंतु जेव्हा एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली असेल तेव्हा इतरांनी त्याहुन चांगली कामगिरी केल्याने त्यांचा सामनावीर पुरस्कार हुकला.

भारताचा कसोटी सलामीवीर मुरली विजयने ६१ कसोटी सामन्यात ३८.२८च्या सरासरीने ३९८२ धावा केल्या आहेत. त्याने डावात १६२ ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तरीही त्याला एकाही सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला नाही. Most Tests in career without a Man of the Match award.

१९९०नंतर पदार्पण करणारे व ६०पेक्षा अधिक सामने खेळूनही सामनावीर पुरस्कार न मिळालेले खेळाडू

७४- दिनेश रामदिन

६९- मोईन अली

६८- पाॅल काॅलिंगवुड

६१- मुरली विजय

६१- सुरंगा लकमल

ट्रेंडिंग घडामोडी-

-शेवटच्या १० ओव्हरमध्ये धु- धु धुणारे जगातील ५ क्रिकेटपटू

-अखेर क्रिकेट जगतात सर्वाधिक चर्चा असलेला हा दौरा झाला रद्द

-आणि फ्लिटाॅफ युवराजला म्हणाला, बाहेर भेट; मी तुझा गळाच कापतो

-या ५ कंपन्यांचे स्टिकर्स असतात भारतीय फलंदाजांच्या बॅटवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---