दुबई। शुक्रवारी इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी विजय मिळवत आयपीएलच्या त्यांच्या चौथ्या विजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्याबरोबर आयपीएल २०२१ हंगामाचा शेवट झाला. या सामन्यानंतर हंगामातील उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यात मोस्ट व्हॅल्यूएबल पुरस्कार अर्थात मालिकावीराचा पुरस्कार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला देण्यात आला.
तो हा पुरस्कार पटकावणारा केवळ तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१० साली सचिन तेंडुलकरला आणि २०१६ साली विराट कोहलीला हा पुरस्कार मिळाला होता.
आयपीएल २०२१ मधील हर्षलची कामगिरी
हर्षलने आयपीएल २०२१ हंगामात १५ सामने खेळताना १४.३४ च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने १ वेळा सामन्यात ५ विकेट्स आणि १ वेळा सामन्यात ४ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. त्याने हा कारनामा मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध केला. त्याने एमए चिदंबरम स्टेडियवर खेळताना मुंबईविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या. तर, दुबईमध्ये खेळताना ४ विकेट्स घेतल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने दुबईमध्ये मुंबईविरुद्ध हॅट्रिकही घेतली होती.
आयपीएलच्या इतिहासात ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर’ पुरस्कार पटकावणारे खेळाडू
२००८ – शेन वॉटसन
२००९ – ऍडम गिलख्रिस्ट
२०१० – सचिन तेंडुलकर
२०११ – ख्रिस गेल
२०१२- सुनील नारायण
२०१३ – शेन वॉटसन
२०१४ – ग्लेन मॅक्सवेल
२०१५ – आंद्रे रसल
२०१६ – विराट कोहली
२०१७ – बेन स्टोक्स
२०१८ – सुनील नारायण
२०१९ – आंद्रे रसल
२०२० – जोफ्रा आर्चर
२०२१ – हर्षल पटेल
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ मधील पुरस्कारांवर ऋतुराज-हर्षलचे वर्चस्व, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
भन्नाटच! जडेजाने घेतले अय्यर अन् नरेनचे अफलातून झेल; पाहून तुम्हीही कराल प्रशंसा
आयपीएलमधील विजेत्या संघाकडून ‘अशी’ कामगिरी करणारा ऋतुराज उथप्पानंतरचा दुसराच फलंदाज