सोमवारी(30 ऑगस्ट) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली.
हा सामना भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी खास ठरला आहे. त्याने या सामन्यात यष्टीमागे 6 झेल घेतले. याबरोबरच त्याने यष्टीरक्षक म्हणून कसोटीत 50 विकेट्सचा घेण्याचा टप्पाही पार केला आहे. त्याचे आता 11 कसोटी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून 53 विकेट्स झाल्या आहेत.
त्यामुळे रिषभ पहिल्या 11 कसोटी सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने हा पराक्रम करताना टिम पेन आणि ऍडम गिलख्रिस्ट यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
पेन आणि गिलख्रिस्ट यांनी त्यांच्या पहिल्या 11 कसोटी सामन्यांनंतर यष्टीमागे प्रत्येकी 52 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच कसोटीत पहिल्या 11 सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये अव्वल क्रमांकावर सध्या इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो आहे. बेअरस्टोने पहिल्या 11 कसोटी सामन्यांनंतर यष्टीमागे 59 विकेट्स घेतल्या होत्या.
या यादीत त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज माजी यष्टीरक्षक मार्क बाऊचर आहेत. त्यांनी त्यांच्या पहिल्या 11 कसोटी सामन्यांनतर यष्टीमागे 57 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर कसोटीमध्ये सर्वात जलद 50 विकेट्सचा टप्पा पार करणाऱ्या यष्टीरक्षकांमध्येही रिषभने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक गिलख्रस्टची बरोबरी केली आहे. गिलख्रिस्टनेही 11 कसोटी सामन्यात यष्टीमागे 50 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला होता.
त्यामुळे कसोटीमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या यादीत गिलख्रिस्ट आणि रिषभ संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
या यादीत मार्क बाऊचर, जॉनी बेअरस्टो आणि टिम पेन हे तिघे संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. या तिघांनींही प्रत्येकी 10 कसोटी सामन्यात यष्टीमागे 50 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला होता.
#पहिल्या 11 कसोटी सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स घेणारे यष्टीरक्षक –
59 – जॉनी बेअरस्टो
57 – मार्क बाऊचर
53 – रिषभ पंत
52 – टिम पेन
52 – ऍडम गिलख्रिस्ट
#कसोटीमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारे यष्टीरक्षक –
10 सामने – मार्क बाऊचर
10 सामने – जॉनी बेअरस्टो
10 सामने – टिम पेन
11 सामने – ऍडम गिलख्रिस्ट
11 सामने – रिषभ पंत
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कर्णधार कोहलीच्या या खास विक्रमाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही!
–आशिया खंडाबाहेर कोहली ठरला सर्वात यशस्वी आशियाई कर्णधार
–भारताच्या कसोटी इतिहासात कर्णधार कोहलीचा ‘विराट’ पराक्रम