हैद्राबाद। कालपासून (6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात(India vs West Indies) 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना काल राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला.
या सामन्यात भारताने 208 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना 6 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात भारताकडून युजवेंद्र चहलने 4 षटके गोलंदाजी करताना 36 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे आता त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत 35 सामन्यात 52 विकेट्स झाल्या आहेत.
त्यामुळे त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या आर अश्विनची बरोबरी केली आहे. अश्विननेही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 46 सामन्यात 52 विकेट्स घेतल्या आहेत.
चहलने हा पराक्रम करताना या यादीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. बुमराहने 42 टी20 सामन्यात 51 विकेट्स घेतल्या आहेत.
-आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
52 विकेट्स – युजवेंद्र चहल (35 सामने)
52 विकेट्स – आर अश्विन (46 सामने)
51 विकेट्स – जसप्रीत बुमराह (42 सामने)
39 विकेट्स – भुवनेश्वर कुमार (41 सामने)
38 विकेट्स – हार्दिक पंड्या (40 सामने)
कोहलीच्या टीम इंडियाचा भीमपराक्रम; कोणालाही न जमलेली गोष्ट करुन दाखवली!
वाचा????https://t.co/ulKBJYZljW????#म #मराठी #INDvWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiBrain #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) December 7, 2019
केएल राहुलच्या या विक्रमाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही!
वाचा????https://t.co/hjTbIAqmqF????#म #मराठी #INDvWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiBrain #KLRahul— Maha Sports (@Maha_Sports) December 7, 2019






