---Advertisement---

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू

On: शुक्रवार, मे 1, 2020 9:52 PM
---Advertisement---

आज, १ मे महाराष्ट्र राज्याचा ६० वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने या लेखात वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ६ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आढावा घेण्यात आलेला आहे.

वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे महाराष्ट्रीयन गोलंदाज – 

५. उमेश यादव –

नागपूरमध्ये जन्म झालेल्या उमेश यादवने झिम्बाब्वे विरुद्ध मे २०१० ला वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मात्र त्याला आत्तापर्यंत केवळ ७५ वनडे सामने खेळता आले आहेत.

यामध्ये त्याने ३३.६३ च्या सरासरीने १०६ विकेट्स घेतल्या आहेत. ३१ धावांत ४ विकेट्स हे उमेशचे सर्वोत्तम वनडे गोलंदाजी प्रदर्शन आहे. त्याने ऑक्टोबर २०१८ मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला आहे.

४. रवी शास्त्री –

भारताचे दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही त्यांची छाप सोडली आहे. त्यांनी नोव्हेंबर १९८१ ला वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथील सामन्यातून पदार्पण केले.

त्यानंतर त्यांनी १५० वनडे सामने खेळताना ३६.०४ च्या सरासरीने १२९ विकेट्स घेतल्या आहेत. १५ धावांत ५ विकेट्स हे त्यांचे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन आहे.

३. सचिन तेंडूलकर –

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने फलंदाजीत तर अनेक मोठे कारनामे केले आहेतच. पण त्याबरोबरच वनडेत सचिनने गोलंदाजीतही भरीव कामगिरी केली आहे. त्याने वनडेत २ वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची देखील कामगिरी केली आहे.

त्याने ४६३ वनडे सामने खेळताना ४४.४८ च्या सरासरीने १५४ विकेट्स घेतल्या आहेत. ३२ धावांत ५ विकेट्स ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

२. झहिर खान – श्रीरामपूरमध्ये जन्मलेल्या झहिर खानने अनेकदा महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तो २०११ च्या विश्वचषकातही तो भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने ऑक्टोबर २००० ला केनिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्याने त्याच्या कारकिर्दीत २०० वनडे सामने खेळताना २९.४३ च्या सरासरीने २८२ विकेट्स घेतल्या आहेत. ४५ धावांत ५ विकेट्स ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

१. अजित आगरकर –

मुंबईकर वेगवान गोलंदाज अजित आगरकर केवळ ९ वर्षे वनडे क्रिकेट खेळला पण त्याने वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथनंतर तिसरा क्रमांक मिळवला आहे.

त्याने एप्रिल १९९८ ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्यानंतर १९१ वनडे सामने खेळले. यात त्याने २८८ विकेट्स घेतल्या. ४२ धावांत ६ विकेट्स ही त्याची गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

ट्रेंडिंग लेख – 

आला पीचवर की पाठव तंबूत, फलंदाजांना भोपळाही फोडू न देणारे ३ भेदक गोलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू

अर्जुन पुरस्काराने सन्मानित ५ महाराष्ट्रीयन क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---