कॅनबेरा। भारताने बुधवारी(२ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात विजय मिळवला. या विजयाने भारताने मालिकेत व्हाईटवॉश टाळला आणि मालिकेचा शेवटही गोड केला. या विजयाने अनेक विक्रमही भारताने केले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे संघ –
बुधवारी मिळवलेला विजय हा भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९२ वा विजय आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंड आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा संघ आहे.
इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण १८१ सामन्यात विजय मिळवले आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध १०० किंवा त्यापेक्षा अधिक विजय मिळवणारा इंग्लंड एकमेव संघ आहे. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९८ विजय मिळवले आहेत.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या ९२ विजयांपैकी २८ विजय कसोटी सामन्यांमध्ये मिळवले आहेत. तसेच ५३ वनडे सामन्यांमध्ये तर ११ टी२० सामन्यांमध्ये मिळवले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ –
१८१ विजय – इंग्लंड
९८ विजय – वेस्ट इंडिज
९२ विजय – भारत
८५ विजय – दक्षिण आफ्रिका
५९ विजय – पाकिस्तान
४८ विजय – न्यूझीलंड
४४ विजय – श्रीलंका
३ विजय – झिम्बाब्वे
२ विजय – बांगलादेश
श्रीलंकेविरुद्ध भारताने मिळवले सर्वाधिक विजय –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने श्रीलंका संघावर सर्वाधिक विजय मिळवले आहेत. भारताने श्रीलंकाविरुद्ध एकूण १२४ विजय मिळवले आहेत. श्रीलंका एकमेव संघ आहे, ज्यांच्याविरुद्ध भारताने १०० किंवा त्यापेक्षा अधिक विजय मिळवले आहेत. श्रीलंकापाठोपाठ भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध ९६ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ विजय मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्या’ खेळाडूच्या आगमनाने संघात आला ताजेपणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर विराटची प्रतिक्रिया
याला म्हणतात दर्जा! जेव्हा मॅकॅग्राने ५३ डॉट टाकत सचिन-गांगुलीला खेळायला लावली होती कसोटी