आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला २७ धावांनी हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. या सामन्यात फाफ डू प्लेसिसला सामनावीराचा किताब देण्यात आला. फाफने या सामन्यात ८६ धावांची शानदार खेळी खेळली. अंतिम सामन्यादरम्यान, एमएस धोनीने त्याच्या नेतृत्त्वाने चाहत्यांची मने तर जिंकलीच पण दुसरीकडे त्याने केकेआरच्या जखमी फलंदाज राहुल त्रिपाठीसाठी एक खास गोष्ट केली, ज्याची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
त्रिपाठी अंतिम सामन्यादरम्यान जखमी झाला होता. सीएसकेच्या डावाच्या सातव्या षटकात त्याच्या पायाला दुखापत झाली, ज्यामुळे फिजिओ मैदानावर आले आणि त्याला मैदानाबाहेर नेले. जेव्हा केकेआरची फलंदाजी आली, तेव्हा राहुल त्याच्या फलंदाजीच्या क्रमाने फलंदाजीला येऊ शकला नाही.
अशा परिस्थितीत जेव्हा केकेआरच्या ७ विकेट्स पडल्या होत्या, तेव्हा राहुल त्रिपाठीने धैर्य दाखवले आणि खेळपट्टीवर फलंदाजीला आला होता. पायाला दुखापत झाल्यानंतरही त्याने अंतिम सामन्यात मैदानावर येण्याचे हे धैर्य दाखवले आणि खेळपट्टीवर येऊन फलंदाजी केली. जेव्हा तो बाद झाला त्याचवेळी सीएसकेचा कर्णधार धोनीने त्रिपाठीच्या या भावनेला सलाम करत, त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला धीर दिला. याशिवाय धोनीने त्याच्या पाठीवर थाप देखील दिली. धोनीच्या या कृतीने चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर धोनीच्या या कृत्याचे कौतुक होत आहे. चाहतेही धोनीचे भरपूर कौतुक करत आहेत.
This was a beautiful gesture from dhoni to Rahul tripathi.struggling with his leg,the way he tried to loft was ????.that's thala dhoni for you♥️. pic.twitter.com/Ejss8372QK
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) October 15, 2021
https://twitter.com/Prash_1998/status/1449068864742907912?s=20
Dhoni,Rahul Tripathi ko tasalli dete huwe.#congratsCSK pic.twitter.com/0aqOoGbRli
— Zohoor Ashraf (@AshrafZohoor) October 15, 2021
यंदाच्या हंगामात सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅप जिंकण्यात यशस्वी झाला आहे. गायकवाड यावर्षी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. सामना संपल्यानंतर गायकवाड म्हणाला की, “संघ विजयी बनल्याने त्याच्या कर्तृत्वाचे महत्त्व वाढले आहे. हा आयपीएल चषक जिंकून ऑरेंज कॅपला महत्त्व प्राप्त झाले आहे ही भावना शब्दात मांडणे कठीण आहे. परंतु गेल्या वर्षीच्या हंगामानंतर येथे जिंकणे ही एक मोठी गोष्ट आहे.”
गायकवाडने स्पर्धेत ६३५ धावा केल्या तर सहकारी सलामीवीर फाफ डू प्लेसिस ६३३ धावांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. अंतिम फेरीत चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या-
अय्या खरंच! आयपीएल विजेता धोनी पुन्हा बनणार ‘बापमाणूस’?, पत्नी साक्षी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा
त्रिपाठीची दुखापत ते चक्रवर्तीचे अपयश; या महत्त्वाच्या ५ कारणांमुळे केकेआरने गमावले आयपीएल विजेतेपद
चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-५ गोलंदाज, अव्वलस्थानी शार्दुलचा दबदबा