---Advertisement---

सीएसकेची मालकी असलेल्या ‘या’ संघाचा मेंटॉर नाही बनू शकणार धोनी, बीसीसीआय ठरलीय कारण

On: शनिवार, ऑगस्ट 13, 2022 2:33 PM
MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणताही भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळू शकत नाही. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी यालाही हाच नियम लागून होणार, अशी पुष्टी बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत नव्याने सुरू होणारी टी-२० लीग ‘सीएसए’मध्ये एमएस धोनी मेंटॉरची भूमिका पार पाडणार, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी समोर येत होत्या, ज्यावर आता पूर्णविराम लागताना दिसत आहे. 

आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांनी सीएसए टी-२० चॅलेंजमध्ये (CSA T20 challenge) जोहान्सबर्ग संघ खरेदी केला आहे. एमएस धोनी (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, पण आयपीएलध्ये अजूनही सीएसकेचे नेतृत्व करतो. अशात सीएसए लीगमध्ये धोनीवर सीएसकेच्या मालकीच्या जोहांन्सबर्ग संघाचा मेंटॉर बनवले जाणार, अशा बातम्या माध्यमांमधून समोर येत होत्या. परंतु, बीसीसीआयने तशी परवानगी दिली नाहीये. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, विदेशी लीगमध्ये भारतीय खेळाडूंना परवानगी दिली जाणार नाही.

एका वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने धोनीविषयी महत्वाची माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले आहे की, “हे अगदी स्पष्ट आहे की, जोपर्यंत कोणताही खेळाडू भारतीय किंवा देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाही, तोपर्यंत तो कोणत्याही दुसऱ्या गेमचा भाग होऊ शकत नाही. जर कुणला या लीगमध्ये खेळायचे असेल, तर त्याला बीसीसीआयशी त्याचे नाते पूर्णपणे तोडावे लागेल.”

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी आयपीएलमध्ये तो आजही खेळत आहे. आयपीएलमध्ये युवा आणि अनुभवी भारतीय, तसेच विदेशी दिग्गज खेळाडू खेळताना दिसतात. आयपीएल बीसीसीआयच्या अंतर्गत येत असल्यामुळे धोनी मात्र विदेशी लीगमध्ये खेळू शकणार नाही. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील या नवीन टी-२० लीगमध्ये जेवढे संघ आहेत, त्या सर्वांचे मालक आयपीएलमधील फ्रँचायझी आहेत. याच कारणास्तव या संघाची नावेही आयपीएलशी मिळती-जुळती आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘भारताजवळ त्याच्यापेक्षा चांगले गोलंदाज’, आशिया चषकातून शमीला डावलण्याच्या निर्णयावर मोठी प्रतिक्रिया

‘मला फक्त २०२३चा विश्वचषक खेळायचा आहे’, असे म्हणत भारताच्या सलामीवीराने सांगितला त्याचा फ्युचर प्लान

भारतीयांना नडणाऱ्या मॅकॉयचा न्यूझीलंडविरुद्ध ‘अष्टपैलू’ खेळ, टी२०तील अद्भुत विश्वविक्रमाला गवसणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---