चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. चेन्नईच्या या मॅच विनर खेळाडूने आतापर्यंत प्रत्येक संघ आणि कित्येक गोलंदाजांविरुद्ध ताबडतोब खेळी केल्या आहेत. मात्र एक गोलंदाज असा आहे, ज्याच्याविरुद्ध धोनीला आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकारदेखील मारता आलेला नाही.
महत्त्वाचे म्हणजे, आज (७ ऑक्टोबर) अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२०चा २१वा सामना होणार आहे. त्यामुळे आज त्याच गोलंदाजाविरुद्ध धोनी खेळताना दिसणार आहे. तो गोलंदाज म्हणजे, कोलकाता संघाचा फिरकीपटू सुनील नरेन हा आहे.
आतापर्यंत धोनी आणि नरेन तब्बल १२वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. दरम्यान धोनीने नरेनच्या ५९ चेंडूंचा सामना करताना केवळ २९ धावा केल्या आहेत. दरम्यान धोनी एकही चौकार किंवा षटकार मारु शकलेला नाही. तसेच नरेनला एकदाही धोनीची विकेट घेता आलेली नाही.
जर धोनीच्या आयपीएल २०२० मधील आतापर्यंतच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत ५ सामने खेळत ९१ धावा केल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला नरेननेही ४ सामन्यात केवळ २ विकेट्स आणि २७ धावांची कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमुळे ‘या’ मोठ्या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलियन खेळाडू
IPL 2020: आज कोलकाता-चेन्नई येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
ट्रेंडिंग लेख-
षटकार किंग! आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारणारे ५ फलंदाज
IPL 2020: चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यात होऊ शकतात ‘हे’ ५ खास विक्रम
IPL 2020: हीच ती ३ कारणे, ज्यामुळे राजस्थानला पहावे लागले पराभवाचे तोंड