भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट कर्णधारांच्या यादीत एमएस धोनी आघाडीवर आहे. त्याने भारतीय संघासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. आयसीसीच्या 3 मोठ्या स्पर्धांचे जेतेपद पटकावणारा तो एकमेव कर्णधार आहे. त्याच्यासोबत फलंदाजी करण्याचे किंवा त्याच्याकडून खेळाविषयी माहिती जाणून घेण्याचे अनेक युवा खेळाडूंचे स्वप्न असते. आता, खेळाडूंना हे स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे. डिसेंबर 2020 मध्ये महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडेमी सुरु होतं आहे.
रुडकीमध्ये सुरु होतेयं अकॅडेमी
उच्च तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या रुडकी शहरात ही अकॅडेमी सुरू होणार आहे. त्यामुळे मुले माजी भारतीय कर्णधार धोनीकडून शिकू शकतील. उत्तराखंडमधील ही पहिलीच एमएस धोनी क्रिकेट अकॅडेमी आहे. याचे उद्घाटन 3 डिसेंबर रोजी होईल. या दिवसापासून खेळाडूंना प्रशिक्षण घेण्याचीही संधी मिळेल, त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
देशात छोट्या शहरात आहेत 35 अकॅडेमी
क्रिकेट अकॅडेमीचे व्यवस्थापक आणि माजी क्रिकेटपटू मिहिर दिवाकर म्हणाले की, “छोट्या शहरांमध्येही क्रिकेटचे अधिक चांगले प्रशिक्षण मिळावे या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आतापर्यंत देशात अशा 35 अकॅडेमी सुरु केल्या आहेत.”
मुलांना मिळणार शिष्यवृत्ती
पुढे बोलताना ते म्हणाले की, “या अकॅडेमीमध्ये सहा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जाईल आणि आर्थिकदृष्टीने दुर्बल परंतु हुशार मुलांनाही शिष्यवृत्ती दिली जाईल.”
प्रतिभावान खेळाडू घडवण्याचा प्रयत्न
या अकॅडेमीचे संचालक अंकित मेहंदीरत्ता यांनी युवा भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतचा संदर्भ देत सांगितले की, “रुडकीमध्ये पंतसारखे प्रतिभावान खेळाडू घडवण्याचा प्रयत्न अकॅडेमी करेल. त्यामुळे अकॅडेमीमधील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर शहर व राज्याचे नाव पुढे नेतील.”
सुरक्षेची घेतली जाईल काळजी
रुड़कीपासून तीन किलोमीटर अंतरावर हरिद्वार रोडवरील राजवाडा फार्म हाऊसजवळ अकॅडेमी सुरु होणार आहे. या संदर्भात बोलताना मेहंदीरत्ता म्हणाले की, “येथे मुलांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
नटराजनच्या यॉर्कर समोर ‘मिस्टर 360’ सुद्धा फेल; उडवला थेट मधला स्टंप, पाहा व्हिडिओ
महिला आयपीएल: ट्रेलब्लेझर-सुपरनोव्हास येणार आमने-सामने; कोण मिळवणार फायनलचं तिकीट?
योग आले जुळून! हैदराबाद जिंकणार आयपीएलचा किताब? पाहा काय आहे कारण
ट्रेंडिंग लेख –
बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा