---Advertisement---

अजबच! धोनीने मारले लांबच लांब शॉट्स आणि मग स्वत:च संघसहकाऱ्यांसह गेला झुडपात चेंडू शोधायला

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 2:30 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे पार पडणार आहेत. त्यामुळे हळूहळू संघांनी युएईमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. युएईमध्ये सर्वात आधी येणाऱ्या संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील खेळाडूंनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करुन सरावाला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे, त्यांच्या सरावादरम्यानचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असतात.

अस्मानी फटके मारताना दिसला धोनी 
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीही आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहे. नुकताच चेन्नई सुपर किंग्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर धोनीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये धोनी ताबडतोड फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने अनेक मोठे-मोठे फटके खेळले.

पण, गमतीची गोष्ट अशी की तुफानी फलंदाजीचा सराव केल्यानंतर धोनी स्वत:च संघसहकाऱ्यांसह चेंडू शोधताना दिसत आहे. तो चेंडू शोधण्यासाठी झाडाझुडपातही घुसलेला दिसतो. विशेष म्हणजे त्याला चेंडू शोधण्यास यशही आल्याचे दिसून येते. धोनीचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

खराब फॉर्ममुळे झाली होती टीका
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात धोनीची बॅट शांत राहिली होती. त्याने फार मोठी कामगिरी केली नसल्याने, तसेच त्याच्या संथगतीने खेळल्याबद्दल त्याच्यावर टीका झाली होती. त्याने आयपीएल २०२१ मध्ये आत्तापर्यंत ७ सामन्यांत केवळ ३७ धावा केल्या. त्यामुळे आता त्याच्याकडून दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरीची आणि तुफानी फलंदाजीची चाहत्यांना अपेक्षा असतील.

चेन्नई सुपर किंग्स संघ जबरदस्त फॉर्ममध्ये
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारतात सुरु झालेल्या आयपीएल २०२१ च्या हंगामाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आता उर्वरित सामने युएईमध्ये घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील कामगिरीनंतर गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ ७ सामन्यांमधील ५ सामन्यांत विजय मिळवून १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स या यादीत १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्स संघ पहिल्या टप्प्यातील उत्कृष्ट फॉर्मच दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

दुसऱ्या टप्प्याला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याने १९ सप्टेंबरला सुरुवात होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटसेना हेडिंग्लेवर करणार ‘पदार्पण’, आजपर्यंत अशी राहिलीये या मैदानावरील भारत-इंग्लंडची कामगिरी

“कर्णधार म्हणून विराटपेक्षा धोनी जास्त आवडतो, तो अजित यांच्यासारखा वाटतो”, वाडेकरांच्या पत्नीकडून कौतुक

‘आम्हाला डिवचल्यास शांत बसणार नाही’, तिसऱ्या कसोटीपूर्वी कर्णधार कोहलीची इंग्लंडला चेतावणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---