भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एमएस धोनी याला ओळखले जाते. धोनीच्या नेतृत्तावत भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्त झाला असला तरीही नेहमी चर्चेत असतो. चाहते त्याच्या प्रत्येक लहान सहान गोष्टीवर लक्ष ठेऊन असतात. सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत धोनी स्वतः बाईक चालवत आहे आणि बाईकवर स्टेडियममध्ये सरावासाठी पोहोचल्याचेही सांगितले जात आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला टी-20 विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या एमएस धोनी (MS Dhoni ) याची एक झलक पाहण्यासाठी चाहते स्वप्न बघतात. अशात जर या चाहत्यांना धोनी एखाद्या सर्वसामान्य नागरिकासारखा बाईक चालवताना दिसला, तर ही नक्कीच मोठी बाब आहे. पण धोनीसाठी यात काही खास नाही. रांचीस्थित धोनीच्या राहत्या घरी बाईक आणि कार्सचे मोठे कलेक्शन आहे. त्यातीलच एक बाईक घेऊन धोनी झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सरावासाठी पोहोचल्याचे बोलले जात आहे. व्हायरल व्हिडिओत धोनी स्वतः ही टीव्हीएस ‘अपाचे’ चालवताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडिओत दोनी बाईक चालू करून त्याठिकाणाहून जाताना दिसत आहे. यावेळी त्याच्या आजूबाजूला काही चाहतेही उपस्थित असल्याचे दिसते. धोनीकडे एकापेक्षा एक बाईक्स असल्या, तरी ‘अपाचे’ चालवताना धोनी पहिल्यांदाच दिसला आहे. चाहते त्याचा हा लूक पाहून भारावले आहेत. व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. अनेकांची धोनीचा हा व्हिडिओ स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/Cn_MUFvMvXZ/?utm_source=ig_web_copy_link
आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच धोनी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्येही यशस्वी ठरला. त्याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. सीएसकेसाठी धोनीने आतापर्यंत चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. आगामी आयपीएल हंगामात जर धोनीने संघाला अजून एक ट्रॉफी मिळवून दिली, तर याबाबतीत मुंबई इंडियन्स आणि सीएसके बरोबरीला येतील. आगामी आयपीएल हंगाम धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा हंगाम असू शकतो. मागच्या काही हंगामांपासून धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. पण धोनीने सांगितल्याप्रमाणे तो यावर्षी रांची म्हणजेच त्याच्या होम ग्राउंडवर आयपीएलचा शेवटचा सामना खेळू शकतो. (MS Dhoni is going to the stadium on a bike for IPL practice)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारतावर दबाव बनवायचा असेल तर…’, ऑस्ट्रेलियाला मिळाला मिचेल जॉन्सनचा गुरुमंत्र
“मला रिषभच्या कानशिलात मारायची आहे”, माजी कर्णधाराचे वादग्रस्त विधान