पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफने भारताचा दिग्गज खेळाडू एमएस धोनीच्या यष्टिरक्षणावर मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. धोनीची गणना जगातील महान कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज म्हणून केली गेली असती. पण लतीफला वाटते की धोनीला जितका चांगला यष्टिरक्षक समजले जाते चांगला यष्टीरक्षक तो नाही.
गेल्या १५ वर्षांतील यष्टिरक्षक फलंदाजांबद्दल बोलताना लतीफ “कॉट बिहाइंड” या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, “धोनीचे नाव मोठे आहे, पण आकडेवारी पाहता, यष्टीरक्षक म्हणून धोनीचा कॅच ड्रॉपची टक्केवारी २१ आहे, ही टक्केवारी खूप मोठी आहे” त्यानंतर तुम्ही किती झेल सोडले असा प्राश्न विचारला असता लतीफ त्याच्या रेकॉर्डबद्दल म्हणाला की, “माझ्याकडे कोणताही रेकॉर्ड नाही. कारण ही रेकॉर्ड ठेवण्याची प्रथा २००२ किंवा २००३ पासून अस्तित्वात आली. त्याआधीच आम्ही खेळ सोडला होता.”
माजी पाकिस्तानी यष्टिरक्षक म्हणाला की, “गिलख्रिस्टच्या ड्रॉपची शक्यता ९ टक्के होती. यष्टिरक्षकाने किती झेल घेतले हे प्रत्येकजण पाहतो, पण त्याने किती झेल सोडले हे कोणी पाहत नाही. किती स्टंपिंग सोडल्या, किती धावा सोडल्या किंवा किती धावा बाय देऊन टाकल्या. हे पाहणे आवश्यक आहे.”
रशीद लतीफच्या मताव्यतिरिक्त धोनीचा यष्टिरक्षणाचा विक्रम उत्कृष्ट आहे. यष्टिरक्षक म्हणून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तिसरा खेळाडू आहे. त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत विकेटच्या मागे ८२९ फलंदाज बाद केलेत, ज्यात १९५ स्टंपिंगचा समावेश आहे. त्यामुळे रेकॉर्डचा आधार घ्यायचा झाला तर धोनी जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांच्या यादीत समाविष्ट आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूने टीका केली म्हणून त्याचा दर्जा कमी होत नाही असा पलटवार सध्या धोनीच्या चाहत्यांकडून केला जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया कप क्वालिफायर्सचे वेळापत्रक झाले जाहीर; हे चार संघ भारत-पाकिस्तानशी भिडण्याचे दावेदार
पाचव्या टी-२०त विश्रांती घेतल्यामुळे सूर्यकुमारला झटका! आयसीसी क्रमवारीत पॉईंट्सने केला घात
अश्विनला आशिया कपसाठी निवडल्याने संतापला भारतीय दिग्गज; म्हणाला, “दरवेळी त्याला…”