नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्याची मदत करणारे मार्गदर्शक देवल सहाय सध्या रुग्णालयात दाखल आहेत. असे असले तरीही चांगली बाब अशी की, त्यांना शनिवारी (५ सप्टेंबर) व्हेंटिलेटरवरून बाजूला केले आहे. सहाय यांना श्वास घेण्यास त्रास, यूरिनची समस्या अशाप्रकारचे आजार आहेत. १९९७- ९८ मध्ये सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडचे (सीसीएल) डायरेक्टर म्हणून युवा धोनीला स्टायपेंडवर ठेवणाऱ्या सहाय यांना मंगळवारी रांचीच्या जग्गनाथ रुग्णालयात आयसीयूमधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट केले होते.
मागील काही दिवसांमध्ये त्यांच्यात सुधारणा दिसली आणि शुक्रवारी त्यांच्या गळ्यामध्ये लागलेली व्हेंटिलेटर ट्यूब काही तासांसाठी बाजूला केली होती. शनिवारी पुन्हा व्हेंटिलेटर बाजूला करण्यात आले आहे आणि सध्या डॉक्टर त्यांचे निरीक्षण करत आहेत. सहाय यांचा मुलगा अभिनव आकाश सहायने म्हटले, “चांगली बातमी अशी की दुपारी १.३० वाजता व्हेंटिलेटर काढण्यात आला आहे. परंतु ते अद्याप आयसीयूमध्ये आहेत.”
सहाय यांची पत्नी मिना यांनी म्हटले, “ते लोक (डॉक्टर) आणखी काही तास त्यांचे निरीक्षण करतील आणि त्यानंतर पुन्हा त्यांचा ऑक्सिजन स्तर आणि इतर गोष्टींची तपासणी करतील. जर सर्वकाही योग्य राहिले, तर ट्यूब पूर्णपणे काढण्यात येईल.”
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “चिंता करण्याची बाब नाही. देवल हे एक योद्धा आहेत आणि ते लवकरच पुनरागमन करतील. देव त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहे.”
अभिनवने सांगितले की, त्याच्या वडिलांनी नुकतेच जेवण बंद केले होते. तो म्हणाला, “ऑक्सिजन स्तर कमी झाला होती, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सोडिअमची कमतरता हे आणखी एक कारण होते. सुरुवातीला आम्हाला भीती वाटली की, हे कोरोना व्हायरसचे तर प्रकरण नाही ना. परंतु जेव्हा अहवाल निगेटिव्ह आला, तेव्हा आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. त्यांच्यात सुधारणा होत आहे. त्यांना यातून बाहेर पडण्यास आता वेळ लागेल.”
धोनीला दिला होता पाठिंबा
सहाय यांनी धोनीला जेव्हा १९९० च्या दशकात सेलमधून (Research and Development for Iron & Steel (SAIL)) आपल्या कंपनीत घेतले होते, तेव्हा केवळ मेकन जिथे धोनीचे वडील काम करत होते. तिथे टर्फ खेळपट्टी होती. ती सहाय यांनी स्वत: च्या मार्गदर्शनात बनविली होती. यानंतर जेव्हा ते सीसीएलला गेले, तेव्हा त्यांनी टर्फ खेळपट्टी बनविली. जेव्हा धोनी सेलकडून खेळणार होता, तेव्हा सहाय त्याला सीसीएलमध्ये घेऊन आले. जिथे त्याच्या खेळात सुधारणा झाली. सहाय यांच्याविषयी धोनीच्या जीवनावर आधारित बनलेल्या एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरीमध्येही सांगण्यात आले आहे.
सीसीएलमध्ये अनेक युवा क्रिकेटपटू ज्यांना सहाय यांनी मार्गदर्शन दिले, ते त्यांना भेटण्यासाठी येत आहेत.
धोनीच्या जवळचे रुग्णालयात सहाय यांची भेट घेत आहेत
सहाय यांच्या जवळचे आणि सीसीएलमध्ये धोनीचे पहिले कर्णधार आदिल हुसैन यांनी शनिवारी सहाय यांची रुग्णालयात भेट घेतली. हसैन म्हणाले, “मी आताच रुग्णालयातून परतलो आहे आणि मी ऐकले आहे की सहाय यांना डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवले आहे. मी ऐकले की, एक डॉक्टर म्हणत होते की सहाय यांना व्यस्त ठेवा आणि झोपू नका देऊ.”
“माझ्याव्यतिरिक्त, माझे आणि धोनीचे सीसीएलचे माजी संघसहकारी जसे की, पुष्पक लाला आणि संजय सिंग, रांची क्रिकेट संघाचे माजी सचिव सुनिल सिंग सातत्याने रुग्णालयात जात आहेत,” असेही हुसैन पुढे बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएलमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी जॉन्टी र्होड्सने केली ‘ही’ विशेष मागणी
-आयपीएल २०२०:२० सामन्यांमध्ये ५० बळी घेणारा युवा गोलंदाज दिल्ली कॅपिटल्स संघात
-“विराट कोहली हा भारतीय आहे म्हणून त्याचे कौतुक करणं थांबवू?” माजी वेगवान गोलंदाज कडाडला
ट्रेंडिंग लेख-
-…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
-बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
-आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत