---Advertisement---

अशी कामगिरी करणारा धोनी पृथ्वीवरील एकमेव खेळाडू

On: मंगळवार, एप्रिल 7, 2020 12:23 PM
---Advertisement---

एमएस धोनीने कर्णधार, फलंदाज व यष्टीरक्षक म्हणून भारतासाठी  अतिशय मोठे योगदान दिले आहे. याचमुळे जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणून धोनीकडे पाहिले जाते. धोनीसारखा चाहता वर्ग जगात कोणत्याही खेळाडूला आजपर्यंत लाभला नाही.

धोनीच्या फलंदाजी, कर्णधार पदाची स्टाईल व यष्टीरक्षणाचे केवळ प्रेक्षक नव्हे तर अनेक माजी खेळाडू, क्रिकेट तज्ञ व अनेक देशांचे मोठे  राजकिय नेतेही चाहते आहेत.

धोनीने भारतीय संघाला अनेक गोष्टी दिल्या. त्याचप्रमाणे त्याने अनेक विक्रमही केले आहेत. त्यातील एक असा विक्रम आहे जो खूपच खास आहे. MS Dhoni only Wicket keeper batsman to Score 175+ score In Both Odi & Test Format.

धोनीने कसोटी व वनडेत १७५ पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. जगात कसोटी व वनडेत १७५ पेक्षा अधिक धावांची खेळी कऱणारा तो जगातील एकमेव यष्टीरक्षक आहे.

धोनीने वनडेत १८३ धावांची खेळी ही श्रीलंका संघाविरुद्ध केली होती. २००५मध्ये एमएस धोनी या नव्या दमाच्या खेळाडूने श्रीलंका संघाविरुद्धच जयपुर येथे नाबाद १८३ धावांची खेळी केली. यात त्याने १५ चौकार व १० षटकार मारले. त्यानंतर धोनीने कसोटीत २०१३मध्ये चेन्नई कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२४ धावा केल्या आहेत.

कसोटीत यष्टीरक्षक म्हणून १२ खेळाडूंनी १७५पेक्षा जास्त धावा केल्या आहेत तर वनडेत यष्टीरक्षक म्हणून केवळ ३ खेळाडूंनाच १७५ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. परंतु धोनीसोडून एकाही खेळाडूला दोन्ही प्रकारात असा कारनामा करता आला नाही.

ट्रेंडिंग घडामोडी- 

म्हणून रोहित-विराट आहे जगातील सर्व खेळाडूंपेक्षा भारी

तुम्ही दोघे आता सन्मानाने निवृत्त व्हा नाहीतर

आयसीसीच्या स्पर्धांत ५०पेक्षा जास्त सामन्यात नेतृत्त्व करणारे दोन कर्णधार

३ फलंदाज जे घेऊ शकतात विराटची आयसीसी वनडेत क्रमावारीतील अव्वल जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---